आदिवासी महिलांसाठी रोजगार निर्मिती स्कूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी महिलांसाठी
रोजगार निर्मिती स्कूल
आदिवासी महिलांसाठी रोजगार निर्मिती स्कूल

आदिवासी महिलांसाठी रोजगार निर्मिती स्कूल

sakal_logo
By

46717
वाशिंद ः येथे महिलांना मार्गदर्शन करताना कोकण संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे.

आदिवासी महिलांसाठी
रोजगार निर्मिती स्कूल

कोकण कला संस्थेचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३१ ः कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील अनेक गावांत मोफत शिलाई प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येत आहेत. त्याचा पुढील भाग महिलांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून देणे हा असून त्यासाठी या महिलांना ३ वेगवेगळ्या प्रकारे उत्पनाचे साधन निर्माण करून देण्याचा मानस संस्थेचा होता. त्यासंदर्भात आयएसएस कंपनीला मदतीचे आवाहन केले होते.
वाशिंद येथे कोकण संस्थेच्यावतीने ‘आयएसएस’च्या माध्यमातून शिलाई स्कूलचे उद्‍घाटन करण्यात आले. या माध्यमातून ५० महिलांना रोजगार प्रशिक्षण, प्रत्येकी शिलाई मशीन, ३ प्रकारचे रोजगार निर्मिती प्रशिक्षण, साधन आणि पुढील १ वर्ष व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून कमीतकमी २५ गावांत शिलाई स्कूल सुरू करण्यात येणार असून या महिलांच्या स्वतःच्या गावात व्यवसाय निर्मितीचे साधन उपलब्ध होणार आहे. या स्कूलची सुरुवात नुकतीच सर्व महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली. कोकण संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे यांनी जमलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या. संस्थेच्या व्यवस्थापक तारा सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षिका स्नेहल मोरे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92033 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..