दुधवडकर, पेडणेकर, दळवी उपनेतेपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुधवडकर, पेडणेकर,
दळवी उपनेतेपदी
दुधवडकर, पेडणेकर, दळवी उपनेतेपदी

दुधवडकर, पेडणेकर, दळवी उपनेतेपदी

sakal_logo
By

46738
अरूण दुधवडकर, किशोरी पेडणेकर, दत्ता दळवी

दुधवडकर, पेडणेकर,
दळवी उपनेतेपदी

शिवसेना पदाधिकारी नियुक्त्या

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३१ ः बंडखोरीनंतर शिवसेना पक्षामध्ये नव्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली जात आहे. यात पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्ह्याचे सुपुत्र व माजी महापौर दत्ता दळवी आणि किशोरी पेडणेकर यांच्यासह अमोल कीर्तिकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी, आशा मामेडी यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली. दुधवडकर, पेडणेकर हे शिवसेनेचे कट्टर निष्ठावान शिवसेना नेते म्हणून परिचित आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तसेच मातोश्रीचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्‍यान, सिंधुदुर्गचे सुपूत्र असलेले अरविंद खासदार यांची काही दिवसापूर्वी शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली होती. तर गौरी शंकर खोत यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92039 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..