Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवात भाज्या महागल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vegetables price hike
गणेशोत्सवात भाज्या महागल्या

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवात भाज्या महागल्या

चिपळूण : तालुक्यातील भाजी मार्केटमध्ये श्रावण महिना सुरू होण्याआधीपासूनच वाढलेले भाज्यांचे दर उतरण्याची चिन्हे नाहीत. गणेशोत्सव काळात भाज्यांची मागणी वाढणार आहे, त्यामुळे भाज्यांचे दर आणखी चढे राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.घाऊक बाजारातच भाज्या महागल्याने किरकोळ बाजारात हेच दर ८० ते १०० रुपये किलोच्या घरात आहेत. त्यामुळे अर्ध्या किलोच्या जागी पाव किलो भाजी घेऊनच सर्वसामान्यांना समाधान मानावे लागत आहे. यावर्षी उन्हाळ्यापासूनच भाज्यांचे दर चढे राहिले आहेत. त्यानंतर अति पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले. त्यामुळे चिपळुणात पोहोचणारी भाजी खराब होत होती तसेच, भाज्यांचे प्रमाणही कमी होते.

त्यामुळे बाजारात भाज्यांचे दर चढेच राहिले. दरवर्षी श्रावणात भाज्या स्वस्त होतात. यावर्षी मात्र ग्राहकांना चढ्या भावानेच भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. गणेशोत्सव काळातही महागच भाज्या खरेदी कराव्या लागणार आहेत, अशी शक्यता बाजारातील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दररोज हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यानुसार बाजारात ज्वाला मिरची, लवंगी मिरचीला जास्त मागणी असते; मात्र घाऊक बाजारात सध्या मिरचीचे दर ४० ते ६० रुपये किलो आहेत तर किरकोळ बाजारात ८० ते ९० रुपये किलो आहे. गेल्या आठवड्यापर्यंत कोथिंबिरीची एक जुडी घाऊक बाजारात ८ ते १० रुपये होती. किरकोळ बाजारात ही जुडी २० रुपयांपर्यंत मिळत होती; मात्र घाऊक बाजारातच कोथिंबीर जुडी २५ ते ३० रुपये झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी ४० ते ५० रुपये झाली आहे.

भाज्यांचे घाऊक दर
भाजी प्रति किलो (रुपयांत)
भेंडी- ३५ ते ५०, चवळी- ४० ते ६०, फरस बी- ५० ते ८०, फ्लॉवर- १५ ते ३०, गवार- ५५ ते ७५, घेवडा- ४० ते ६०, ढोबळी मिरची- ४० ते ४५, पडवळ- ४५ ते ५५, शेवगा- ४० ते ५०, शिराळी दोडकी- ४० ते ६०, तोंडली- ५० ते ७०, वाटाणा- ७० ते १००.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92074 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..