संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

जुना कालभैरव देवस्थान
गणेशोत्सवास प्रारंभ
चिपळूण ः शहराचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टच्या गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे. हा उत्सव 5 सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे श्री जुना कालभैरव देवस्थानतर्फे गणेशोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. मंगळवारी सायंकाळी श्री गणेशमूर्तींचे मंदिरात वाजतगाजत आगमन झाले. बुधवारी (ता. 31) पहाटे श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. 3 सप्टेंबरला सकाळी श्री गणेशासमवेत श्री देव कालभैरव-श्री देवी योगेश्‍वरी आणि श्री देव केदार, श्री देवी जाखमाता यांच्या चलमूर्तींची प्रतिस्थापना, 4 ला श्रींचा दर्शन सोहळा व रात्री 9.30 वा. श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ, ओझरवाडी ग्रामस्थ यांचा भजन कार्यक्रम होणार आहे. 5 सप्टेंबरला दुपारी 3.30 वाजता श्री गणेश विसर्जन सवाद्य मिरवणूक श्री जुना काळभैरव मंदिरातून निघून श्री क्षेत्र गांधारेश्‍वर नदी घाटावर जाईल.


फोटो ओळी
-rat31p1.jpg ःKOP22L46733
चिपळूण ः नवनिर्वाचित सरपंच श्रावणी मोहिते यांचा सत्कार करताना तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते व पदाधिकारी.


भोमच्या सरपंच श्रावणी यांचा सत्कार
चिपळूण ः तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती भोम शाखेतील महिला मंडळाच्या सचिव श्रावणी मोहिते यांची नुकतीच भोम गावच्या सरपंचपदी निवड झाली. याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका चिपळूण यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पक्षाचे प्रभारी तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, अशोक कांबळे, संदेश कदम, सुभेदार मेजर दत्ताराम मोहिते, उमेश सकपाळ, संजय मोहिते, विनोद मोहिते, सुनील मोहिते, कदम आदी मान्यवर उपस्थित होते..


फोटो ओळी--KOP22L46735
-rat31p3.jpg ः चिपळूण ः रुग्णांची आरोग्य तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी सोबत आरोग्यसेवक.

मालदोलीतील आरोग्य शिबिराला प्रतिसाद
चिपळूण ः लोकजागृती फाउंडेशन रत्नागिरी यांच्या सहकार्याने नॅब आय हॉस्पिटल, अपरांत हॉस्पिटल, सावंत ऑप्टिशियन चिपळूण यांच्यावतीने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे व ग्रामपंचायत मालदोली यांच्या योगदानातून ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात नुकतेच मोफत आरोग्य तपासणी, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. 70 नागरिकांनी तपासणी करून घेतली. त्यातील 23 वयोवृद्ध नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले. त्यांची टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया होणार आहे. इतर तपासणी केलेल्या नागरिकांना मोफत औषधोपचार करण्यात आला. शिबिराला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात अपरान्त हॉस्पिटलच्यावतीने संपूर्ण आरोग्य तपासणीसह रक्त, लघवी, ब्लडप्रेशर, सर्व आजारांची तपासणी आणि नॅब आय हॉस्पिटलच्यावतीने मोतीबिंदू तपासणी आणि मोतीबिंदूसदृश रुग्णांची तद्नंतर शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. शिबिरामध्ये अपरान्त हॉस्पिटलच्यावतीने डॉ. भक्ती पालांडे (सर्जन), डॉ. रजनीश रेडीज, राजीव कांबळे, आरोग्यसेविका प्रतीक्षा, अंकिता यांनी तर नॅब आय हॉस्पिटलच्यावतीने डॉ. सुरवसे यांनी तपासणी केली. त्यांच्या समवेत व्यवस्थापक बाबू नलावडे हेही उपस्थित होते. सावंत ऑप्टिशियन यांच्यावतीने अल्पदरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी मालदोलीच्या सरपंच, लोकजागृती फाउंडेशनचे कार्याध्यक्ष परशुराम निवेंडकर, सहसचिव महेंद्र मांडवे, नरेंद्र चव्हाण, उमेश मोहिरें, ममता मांडवे, सुजाता कानडे, स्वाती वरवडेकर, अशासेविका, मदतनीस, गावप्रमुख तसेच आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिपळुणात मंगळवारी तालुकास्तरीय गायन स्पर्धा
चिपळूण ः श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणतर्फे गणेशोत्सव कालावधीत तालुकास्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येथील माधव सभागृहात होणार आहे. आहे. मंगळवारी (ता. ६) सायंकाळी४ वा. तालुकास्तरीय अभंग, नाट्यगीत गायन स्पर्धा दोन गटात होणार आहे. पाचवी ते सातवी पहिला गट आणि महाविद्यालयीन गट अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ पाटणकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92135 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..