आंजर्ले ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंजर्ले ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव
आंजर्ले ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव

आंजर्ले ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव

sakal_logo
By

आंजर्ले ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव
दाभोळ ः दापोली तालुक्यातील आंजर्ले ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विधवा महिलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगता यावे, त्यांना सुहासिनी महिलांप्रमाणे मानसन्मान मिळावा यासाठी शासनाकडून केलेल्या विधवा प्रथा बंदच्या निर्णयाला चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. तामोंड दमामे नंतर दापोलीतील आंजर्ले ग्रामपंचायतीने ही जुनी प्रथा बंद केली. स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त तिळगुळ समारंभाचे नियोजन करण्यात आले. त्या वेळी विधवा महिलांना मार्गदर्शन करत हळदीकुंकू देण्यात आले. विधवा प्रथा बंद करण्याकरिता ग्रामस्थांमधून चांगलाच प्रतिसाद मिळाला. आंजर्ले ग्रामपंचायतीच्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
-------------------
दाभोळ खाडीवरील पुलासाठी निवेदन
दाभोळ ः दाभोळ हे ऐतिहासिक काळातील एक प्रसिद्ध बंदर असून या भागातील लोकांना पर्यटन उद्योगाच्या मदतीने आपले जीवन विकसित करावयाचे असल्याने रस्त्यांची चांगली जोडणी आवश्यक आहे. त्यासाठी दाभोळ खाडीवर पूल असणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबतचे निवेदन भाजपा उत्तर रत्नागिरी महिला आघाडी मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता जावकर यांनी केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांना नुकतेच खेड येथे दिले आहे. आजकाल महाराष्ट्र शासनाकडून दाभोळ ते धोपावेपर्यंत फेरीबोट सेवा उपलब्ध आहे; परंतु त्यात अनेक समस्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दाभोळ खाडीपुलाचा प्रस्ताव सातत्याने प्रलंबित आहे.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92136 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..