पुरस्काराचे 10,000 दिले दोन संस्थाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरस्काराचे 10,000 दिले दोन संस्थाना
पुरस्काराचे 10,000 दिले दोन संस्थाना

पुरस्काराचे 10,000 दिले दोन संस्थाना

sakal_logo
By

पुरस्काराचे १०,००० दिले दोन संस्थाना
सुहास कोते ठरले ‘सामाजिक कार्यकर्ता’
देवरूख, ता. ३१ःज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सेवा दल सैनिक सुहास कोते यांना परिवर्तन संस्था मुंबईचा ‘सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ मिळाला. या पुरस्काराची अर्धी रक्कम रुपये ५००० त्यांनी मातृमंदिरच्या गोकुळ बालगृहासाठी देणगी जाहीर केली. पुरस्काराच्या रकमेवर माझा अधिकार नाही, अर्धी रक्कम मातृमंदिर गोकुळसाठी अशा शब्दात सुहास कोते यांनी भावना व्यक्त केल्या. यासह त्यांनी कल्याण येथील डंम्पिग ग्राऊंडच्या साठेनगर मधील कचरा वेचणार्या मुलांसाठी काम करणाऱ्या ‘अनुबंध’ संस्थेला ५००० रुपये मदत निधी दिला. पुरस्कार माझा आहे, पण पुरस्काराची रक्कम माझी नाही. म्हणून मी ती विशेष सामाजिक काम करणाऱ्या संस्थेस देत आहे, असे सांगितले.
पुरस्कार निमित्ताने साथी महम्मद खडस व मनोहर कदम यांचे स्मरण करीत आणि साथी गजानन खातू व संजीव साने या मार्गदर्शक आणि सहकार्याचा विशेष उल्लेख केला. ज्यांनी सेवा दलाची प्रेरणा दिली, अन् सामाजिक कामात आलो, त्या सेवा दलाच्या साथी अनंत जोशी यांचे स्मरण करुन त्यांना हा पुरस्कार समर्पित केला. मुंबईत राहून मातृमंदिरच्या कामात नेहमीच शक्य ती सर्व मदत करणाऱ्या कोते सरांनी मातृमंदिरच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिले होते.मातृमंदिर परिवाराकडून सुहास कोते यांचे या पुरस्कारासाठी अभिनंदन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92141 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..