रघुवीर वायंगणकर यांना महाराष्ट्र रक्षक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रघुवीर वायंगणकर यांना
महाराष्ट्र रक्षक पुरस्कार
रघुवीर वायंगणकर यांना महाराष्ट्र रक्षक पुरस्कार

रघुवीर वायंगणकर यांना महाराष्ट्र रक्षक पुरस्कार

sakal_logo
By

46860
रघुवीर वायंगणकर


रघुवीर वायंगणकर यांना
महाराष्ट्र रक्षक पुरस्कार
मसुरे, ता. ३१ ः नारिंग्रे (ता.देवगड) गावचे सुपुत्र व घाडीगावकर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर यांना २ सप्टेंबरला कणकवली नगरपंचायत सभागृहात ‘महाराष्ट्र रक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, महाराष्ट्र समाज भुषण गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, सिंधुदूर्ग रत्न पुरस्कार, कोकण रत्न पुरस्कार आदी विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नारिंग्रे शिक्षण संस्था, मुंबईचे सहचिटणीस म्हणून ते काम पाहत आहेत. तर मराठी वृत्तपत्रलेखक संघाचे सदस्य आहेत. रघुवीर वायंगणकर हे सामाजिक बांधिलकीतून घाडीगावकर समाजाचे वधू-वर मेळावे आयोजित करतात. तसेच मुंबईतील व ग्रामीण भागातील अनेक सामाजिक व क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वायंगणकर यांनी समाजात विविध क्षेत्रात चांगले समाजकार्य करण्याबरोबरच दोन वर्षांच्या कालावधीत कोविड जनजागृती करून कोविड पीडितांची सेवाही केली होती. कोविड काळातील योगदान लक्षात घेऊन साप्ताहिक प्रकट महाराष्ट्र व प्रकट महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्यावतीने शुक्रवारी (ता.२) कणकवली नगरपंचायत सभागृहात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92147 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..