देवगडला आरास सजावट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडला आरास 
सजावट स्पर्धा
देवगडला आरास सजावट स्पर्धा

देवगडला आरास सजावट स्पर्धा

sakal_logo
By

देवगडला आरास
सजावट स्पर्धा
देवगड, ता. ३१ ः सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पुरस्कृत आणि देवगड तालुका काँग्रेस आयोजित गणेशचतुर्थी निमित्ताने घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा शुक्रवार (ता. २) ते १२ सप्टेंबर दरम्यान तालुक्यात घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरातील गणपतीच्या जवळ केलेल्या सजावटीचा, चलचित्राचा एक मिनिटांचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पाठवायचा आहे सोबत स्पर्धकांचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवायचा आहे. व्हिडीओ लवकरात लवकर पाठवावा जेणेकरून परिक्षकांना परिक्षण करणे सोईचे होईल. व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख गणेश विसर्जनाच्या एक दिवस अगोदर पर्यंतच राहील. त्यानंतर आलेला व्हिडीओ स्पर्धेसाठी विचारात घेतला जाणार नाही. स्पर्धेचे परिक्षक व्हिडीओ पाहून आवश्यकता वाटल्यास घरी येऊन परिक्षण करतील. तालुक्यातील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कॉंग्रेसचे संपर्कमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल. विजेच्या स्पर्धकांना अनुक्रमे, १११११, ७७७७, ५५५५ तर दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी १००० व सर्वांना प्रमाणपत्र अशी बक्षीसे दिली जातील. उल्हास मणचेकर किंवा उमेश कुलकर्णी यांच्याकडे व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92148 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..