रत्नागिरी-पारंपरिक आरत्यांचे स्पर्धेतून होणात जतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-पारंपरिक आरत्यांचे स्पर्धेतून होणात जतन
रत्नागिरी-पारंपरिक आरत्यांचे स्पर्धेतून होणात जतन

रत्नागिरी-पारंपरिक आरत्यांचे स्पर्धेतून होणात जतन

sakal_logo
By

पारंपरिक आरत्यांचे स्पर्धेतून होणात जतन
सकाळ माध्यम समूह अन इन्फिगो ; जिल्हास्तरीय स्पर्धा
रत्नागिरी, ता. ३१ः लाडक्या बाप्पाचा सण दोन दिवसांवर आला असून सर्वत्र गणेशमय मंगल वातावरण पाहायला मिळत आहे. कोकणात विशेषतः गावागावांमध्ये बाप्पांच्या आरत्या पारंपरिक पद्धतीने आणि निरनिराळ्या चालीत, संगीताच्या चालींवर म्हटल्या जातात. घराघरांत गायल्या जाणाऱ्या या आरत्यांचे पुनरुज्जीवन व्हावे व त्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात याकरिता इन्फिगो आय केअर आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने जिल्हास्तरीय आरती सादरीकरण स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेची संकल्पना इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी मांडली. रत्नागिरी जिल्हास्तरीय पारंपरिक आरत्या सादरीकरण स्पर्धेला गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद लाभला होता. अजूनही अनेक आरत्या ग्रामीण भागांत वेगवेगळ्या चालीत ढंगात गायल्या जातात. त्यांचेही संकलन व्हावे आणि त्यांचे पुनरुज्जीवन करून जगासमोर हा अमूल्य ठेवा पोहोचावा, या हेतूने सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून अत्यंत रसाळ, प्रासादिक आरत्या सादर करणाऱ्या भक्तजनांना व्यक्तीशः तसेच सांघिक आरती सादरीकरण करून आपली कला पेश करण्याची संधी मिळणार आहे.
मौखिक आणि लिखित परंपरेने चालत आलेल्या आरत्यांचे सादरीकरण दर दहा मैलावर बदलणाऱ्या भाषेप्रमाणे वैविध्यपूर्ण असते. नित्यनूतन आरत्यांची भर पडत असली, तरी जुन्या आरत्यांची गोडी वेगळीच आहे. अशा आरत्यांचे वैविध्य आणि त्याचा बाज टिकवून ठेवला असला तरी दिवसेंदिवस अशा पारंपरिक आरत्या आणि त्यांचे सादरीकरण मर्यादित झाले आहे. अशा आरत्या आणि त्यातील वैविध्य विस्मरणात जाऊ नये म्हणून पारंपरिक, दुर्मिळ आरत्यांची स्पर्धा रंगणार आहे.

चौकट
असा असावा व्हिडिओ
स्पर्धकांनी कोणत्याही एका पारंपरिक आरती सादरीकरणाचा व्हिडिओ करावा, व्हिडिओ वैयक्तिक व सांघिक अशा कोणत्याही स्वरूपात चालेल, व्हिडिओच्या सुरवातीला स्वतःचे किंवा गटाचे नाव, पत्ता व व्हिडिओ केल्याची तारीख नमूद करावी, गणेशोत्सवात नेहमी म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांपेक्षा वेगळ्या आरत्या अपेक्षित आहेत. व्हिडिओ व त्याचा ऑडिओ एडिट केलेला नसावा.

चौकट
९ सप्टेंबरपर्यंतची मुदत
स्पर्धकांनी आरतीचा व्हिडिओ ९३७२७६६५०८ या व्हॉटस् अप क्रमांकावर किंवा ganeshutsav.infigo@gmail.com या इ मेल आयडीवर पाठवावा. आरतीचा व्हिडिओ पाठविण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. यातील उत्कृष्ट प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक पारितोषिक आणि तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम असून स्पर्धा नियोजनात बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे राखून ठेवण्यात आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92163 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..