साडवली-संगमेश्वरमध्ये गणरायांचे उत्साहात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-संगमेश्वरमध्ये गणरायांचे उत्साहात स्वागत
साडवली-संगमेश्वरमध्ये गणरायांचे उत्साहात स्वागत

साडवली-संगमेश्वरमध्ये गणरायांचे उत्साहात स्वागत

sakal_logo
By

rat31p31.jpg-
46880
देवरूखः गणरायांना उत्साहात घरी नेताना भाविक.
----------
संगमेश्वरमध्ये गणरायांचे उत्साहात स्वागत
साडवली, ता. ३१ः दोन वर्षानंतर गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. गणेश चतुर्थीला संगमेश्वर तालुक्यात गणरायांचे उत्साहात आगमन झाले. मंगळवारी संध्याकाळपासूनच गणेश मिरवणुकांना धुमधडाक्यात प्रारंभ झाला. बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी होती. रेल्वे, बस, खासगी बस, स्वतःच्या वाहनांनी चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले. महामार्गावरील खड्ड्यांच्या विघ्नावर मात करून लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी भाविक गावी आले आहेत. देवरूख व संगमेश्वर पोलिस, देवरूख एसटी आगाराने चांगले नियोजन केल्याने भाविकांना अडचण आली नाही. ठिकठिकाणी सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी भाविकांची चांगली सोय केली. बुधवारी रात्रीपासून आरत्यांचे मंजूळ स्वर, जाखडी, भजन यांचे आवाज घुमू लागले आहेत. वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92169 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..