चतुर्थीच्या मुहुर्तावर पावसाची मुसंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चतुर्थीच्या मुहुर्तावर 
पावसाची मुसंडी
चतुर्थीच्या मुहुर्तावर पावसाची मुसंडी

चतुर्थीच्या मुहुर्तावर पावसाची मुसंडी

sakal_logo
By

चतुर्थीच्या मुहूर्तावर
पावसाची मुसंडी
सह्याद्री पट्ट्यात जोर; विजांच्या कडकडाटाही
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३१ ः गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विजांच्या कडकडाटांसह जोरदार हजेरी लावली. सायंकाळी तीनपासून जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी पडत असून सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर अधिक आहे. पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती; मात्र दोन दिवसांपासून काही भागात हलक्या सरींना सुरूवात झाली होती. या वर्षी गणेशोत्सवाची पूर्व तयारी करण्यास पावसाने गणेशभक्तांना पूर्ण मोकळीक दिली होती. आज सकाळपासून पावसाचे वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती होती. मात्र, दुपारी दोनपर्यत पाऊस पडला नाही. दुपारी तीननंतर विजांच्या कडकडाट सुरू झाला. त्यानंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण या सर्व तालुक्यांमध्ये पावसाच्या सरीवर सरी कोसळल्या. विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडत होता. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर अधिक होता. भात, नाचणी शेतीला पावसाची गरज होती. त्यामुळे हा पाऊस शेतीला उपयुक्त मानला जात आहे. दरम्यान, पुढील दोन-तीन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे गणेशोत्सवावर पावसाचे सावट राहण्याची शक्यता आहे. गेले दोन तीन पाऊस नसल्यामुळे चाकरमान्यांना चांगली खरेदी करता आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92192 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..