दारू बाळगल्या प्रकरणी कसालच्या महिलेवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू बाळगल्या प्रकरणी
कसालच्या महिलेवर गुन्हा
दारू बाळगल्या प्रकरणी कसालच्या महिलेवर गुन्हा

दारू बाळगल्या प्रकरणी कसालच्या महिलेवर गुन्हा

sakal_logo
By

दारू बाळगल्या प्रकरणी
कसालच्या महिलेवर गुन्हा

ओरोस, ता. ३१ ः बिगर परवाना दारू बाळगल्या प्रकरणी कसाल बाजारपेठ येथील फुलोमीना मीनीन फर्नांडिस (वय ७०) यांच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई काल (ता.३०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली. दोन हजार ५२० रुपयांची दारू यावेळी जप्त करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस नाईक अश्विनी ज्ञानदेव भोसले यांनी तक्रार दाखल केली आहे. एका पिशवीमध्ये १८० मिली मापाची प्लास्टिकच्या १८ कंपनी सीलबंद बाटल्या त्यांच्या जवळ मिळाल्या आहेत. यातील एका बाटलीची किंमत १४० रुपये आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92194 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..