फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

केवळ फोटो

कुंचल्यातून मिरवणूक
46752
देवरूख ः गणेश आगमन मिरवणुकीचे आठल्ये- सप्रे- पित्रे महाविद्यालयातील विद्यार्थी सागर प्रदीप जाधव याने कागदावर रेखाटलेले सुंदर चित्र.
--------------

४६९११
बांदा ः बाजारपेठ व गणेश शाळेला बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.

गणेश मूर्ती चित्रशाळेला
बांदा केंद्र शाळेची भेट
बांदा ः जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा क्रमांक १ शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत बांदा येथे असलेल्या गणेश मूर्ती चित्र शाळा व बाजारपेठेला भेट देऊन माहिती विविध प्रकारची माहिती मिळवली. दरवर्षी कोकणासह महाराष्ट्रभर गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणाच्या निमित्ताने अनेक स्थानिक मूर्तीकार विविध प्रकारच्या गणेश मूर्त्या बनवत असतात. बांदा गावात शाडू मातीपासून अनेक मूर्तिकार पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या बनवतात. या गणेश चित्र शाळांना विद्यार्थ्यांनी भेट दिली व मूर्तीकारांच्या मुलाखतीतून विविध प्रकारची माहिती मिळवली. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणपती व रंगकामाची माहिती करुन घेतली. यावेळी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेश सजावटीच्या साहित्याने आकर्षकपणे सजलेल्या बाजारपेठेला ही विद्यार्थ्यांनी भेट देऊन विविध साहित्याची‌ पाहणी केली तसेच सुतार शाळेला भेट देऊन गणपती सणासाठी सुतार व्यावसायिक यांनी लाकडापासून बनवलेल्या माटी, पाट अशा साहित्याची माहिती करुन घेतली. ही क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
---
४६८५२
सांगेली ः येथे धान्य वाटप करताना काँग्रेस पदाधिकारी.

सांगेलीत काँग्रेसतर्फे धान्य वाटप
सावंतवाडी ः गणेश चतुर्थीनिमित्त सावंतवाडी काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कॉग्रेस पदाधिकारी यांनी आपल्या सर्व हिंदू समाजबांधवांचा सण गोड ह्यावा या प्रेमळ भावनेतून आज सांगेली पंचक्रोशीत धान्न्याचे वाटप केले. वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेसाठी हा आनंद्देई दिलासा दिला. याप्रसंगी सांगेली गावचे प्रमूख गावकरी बाळा सरगावकर (रामा शिवा राऊळ) यांच्या हस्ते अन्यधान्य साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर, तालुका सरचिटणीस रूपेश आईर, विभागीय अध्यक्ष अॅड. गुरुनाथ आईर, विभागीय उपाध्यक्ष संतोष सावंत, सांगली ग्रामस्थ मधुकर सावंत, साबा राऊळ, भिवा राऊळ, पारधी राऊळ, श्रीमती रेमुळकर, देऊ फाले, लक्ष्मण कुंभार, राजू कुंभार, प्रशांत सावांत भोसले, सचिन राणे, संतोष तावडे, न्हानू पालव, बाळकृष्ण देसाई, विनायक पालव आदी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
--
प्रतिष्ठापनेनंतर पावसाचे आगमन
सावंतवाडी ः तालुक्यात गणेश आगमनाच्या उत्साहात भाविक दंग असताना वीज आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. शहराचा वीजपुरवठाही खंडित झाल्यामुळे गणेशभक्तांचा हिरमोड झाला. चैतन्य आणि मांगल्याची द्वाही फिरवणाऱ्या आणि विघहर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मकता पेरणाऱ्या गणरायांचा उत्सव बुधवारपासून सुरू झाला. मंगळवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सकाळी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे ढोलताशांच्या गजरात आणि गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये हजारो गणपतींचे घरोघरी आगमन झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपामध्येही गणराय विराजमान झाले. त्यानंतर सांयकाळी पावसाने जोरात हजेरी लावली. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील नाले तुडूंब भरून वाहू लागले. विजेचा लखलखाट जोरात सुरू होता. त्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सायंकाळी सार्वजनिक गणेशमूर्तींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या कमी झाली. सांयकाळी चारवाजेपासून विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. आठवड्यापासून उकाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या मुसळधार सरींनी दिलासा दिला; मात्र गणेश दर्शनासाठी ज्यांना बाहेर पडायचे होते त्यांना घरातच थांबावे लागले.
----
उत्सव श्रींचा; जागर पर्यावरणाचा
सावंतवाडी ः गणेशोत्सव काळात धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नागरिक एकवटले आहेत. त्यामुळे उत्सव श्रींचा आणि जागर पर्यावरणाचा असा दुहेरी संगम पाहायला मिळत आहे. जलप्रदूषण, ध्वनिप्रदुषणाचे प्रमाण पाहता यावर्षी पर्यावरणावर अधिक भर देण्यात आला आहे. तालुक्यात श्रींचे आगमन जल्लोषात झाले. बाप्पाच्या स्वागतानंतर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ढोलताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत झाले. यात महिलांचाही सहभाग महत्त्वाचा होता. यावर्षीचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली व्हावा यासाठी पालिकेकडून स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रींच्या माध्यमातून पर्यावरणाचा जागर करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे तयार करताना पर्यावरण बचाव मोहीम सुरू केली आहे. प्लास्टिक व थर्माकॉलच्या वस्तूंवर बंदी असल्यामुळे घरगुती व सार्वजनिक मंडळातून प्लास्टिक व थर्माकॉलच्या वस्तू हद्दपार झाल्या आहेत. घरगुती श्रींना करण्यात येणारी सजावट, देखावा, पर्यावरण जनजागृती न सामाजिक बांधिलकी आदींवर भर देण्यात आला आहे. अनेक सामाजिक संस्था, पक्ष आणि मंडळांनी स्पर्धाही आयोजित केल्या आहेत.
---
४६९१०
कल्पना मलये

मलयेंच्या ग्रंथाला पुरस्कार
कणकवली ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २०२१ या वर्षातील विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारामध्ये कणकवलीतील शिक्षिका कल्पना मलये यांच्या ‘कारटो’ या बालग्रंथाचा समावेश आहे. पुणे येथील एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ हिंदी लेखिका सूर्यबाला यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कल्पना मलये यांच्या ‘कारटो’ या बाल ग्रंथाला व्ही. व्ही. बोकील स्मृती पारितोषिक जाहीर झाले आहे. कल्पना मलये या कणकवली जिल्हा परिषद शाळा नंबर ५ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ‘कारटो’ या बालवाङ्‌मय ग्रंथाच्या पहिल्या दोन आवृत्ती हातोहात संपल्यानंतर. तिसरी आवृत्ती ही प्रसिद्ध झाली. बाल साहित्यात लोकप्रिय झालेल्या ''कारटो'' या ग्रंथासाठी या पुरस्काराची निवड झाली आहे. या निवडीबद्दल कल्पना मलये यांचे अभिनंदन होत आहे.
--
वाहनाच्या धडकेत
तिवरेतील महिलेचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३१ ः मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे मंगळवारी (ता.३०) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्‍या अपघातात तिवरे येथील महिलेचा मृत्‍यू झाला. शेवंती गंगाराम चव्हाण (वय ४७,रा.तिवरे, चव्हाणवाडी) असे तिचे नाव आहे. महामार्गावरून जात असताना तिला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताबाबतची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचा पंचनामा केला. या अपघाताची आकस्मिक मृत्यू म्हणून कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92212 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..