गणपतीपुळेत ‘श्रीं’चे पदस्पर्शदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपतीपुळेत ‘श्रीं’चे पदस्पर्शदर्शन
गणपतीपुळेत ‘श्रीं’चे पदस्पर्शदर्शन

गणपतीपुळेत ‘श्रीं’चे पदस्पर्शदर्शन

sakal_logo
By

४६८७९
गणपतीपुळे ः येथील गणपती मंदिरात ‘श्रीं’चे पदस्पर्शदर्शन घेताना भक्तगण.

गणपतीपुळेत ‘श्रीं’चे पदस्पर्शदर्शन

वर्षातून एक दिवसच पर्वणी; दोन हजार भाविकांची उपस्थिती

रत्नागिरी, ता. ३१ ः ‘एक गाव-एक गणपती’ ही मागील पाचशेहून अधिक वर्षांची परंपरा गणपतीपुळेत आहे. त्यानुसार कोरोना काळातील खंडित काळानंतर दोन वर्षांनी आज, गणेशचतुर्थीला थेट गाभाऱ्‍यात जाऊन गणपतीपुळेच्या ‘श्रीं’ची पदस्पर्श करून दर्शनासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
गणपतीपुळ्याच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अंगारकीसह संकष्टी चतुर्थीला मोठी गर्दी होत असते. पर्यटकही या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. गणपतीचे दर्शन गाभाऱ्‍याच्या बाहेरून घ्यावे लागते. मात्र वर्षातील एक दिवस, भाद्रपद चतुर्थीला गाभाऱ्‍यात जाऊन गणरायाच्या चरणाशी स्पर्श करून दर्शन घेण्याची परंपरा आहे. गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपतीपुळ्यात भाविकांसाठी इथला गाभारा हा खुला ठेवला जातो. वर्षातून एकदाच ‘श्रीं’ना पदस्पर्श करण्याची संधी भाविकांना मिळते. त्या प्रथेनुसार आज पहाटे पूजा आटोपल्यानंतर साडेचार वाजता ग्रामस्थांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मालगुंड, नेवरे, गणपतीपुळे, भंडारपुळे आणि निवेंडी ग्रामस्थांनी दुपारी १२ पर्यंत ‘श्रीं’चे पदस्पर्शाने दर्शन घेतले. शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे पर्यटकांनीही गणपतीपुळेमध्ये हजेरी लावली आहे. त्यांनाही याचा लाभ घेता आला. सायंकाळपर्यंत दोन हजारांहून अधिक भक्तांनी दर्शन घेतले. कोरोनामुळे मागील दोन वर्षे येथील ग्रामस्थांना पदस्पर्शाने दर्शन घेता आलेले नव्हते. ती प्रथा कायम ठेवता आल्याचे समाधान यंदा ग्रामस्थांमध्ये होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92229 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..