52 कुटुंबियांचा अधिपती- माड्याचीवाडीतील गावडे परिवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

52 कुटुंबियांचा अधिपती- माड्याचीवाडीतील गावडे परिवार
52 कुटुंबियांचा अधिपती- माड्याचीवाडीतील गावडे परिवार

52 कुटुंबियांचा अधिपती- माड्याचीवाडीतील गावडे परिवार

sakal_logo
By

swt११०.jpg
46978
माड्याचीवाडीः नेरूर वाघचौडी येथील ५२ गावडे कुटुंबीयांचा पाच पिढ्यांचा अधिपती. (छायाचित्र ः सचिन गावडे)

५२ कुटुंबियांचा अधिपती
माड्याचीवाडीतील गावडे परिवार ः पाच पिढ्या जोपासताहेत वारसा
अजय सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः आज एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली असताना मात्र तालुक्यातील नेरूर वाघचौडी माड्याचीवाडी येथील गावडे घराण्याने गेली पाच पिढ्यांचा वारसा जोपासला आहे. त्यांच्या ५२ कुटुंबीयांचा (५२ चुली) अधिपती हे निश्चितच एकत्र कुटुंबाचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. पाचच दिवसांचा त्यांचा गणपती असतो. ववसा कार्यक्रम हे सुद्धा या घराण्याचे वैशिष्ट्य आहे. गेले दोन वर्षे कोरोना नियमांच्या अधीन राहून मोजकीच माणसे होती. यावर्षी मात्र चाकरमानी दाखल झाल्याने ही संख्या सुमारे पाचशे ते साडेपाचशे झाली आहे. या घराण्याने पाच दिवसांचा नियोजनबद्ध उपक्रम हाती घेतला आहे.
गेल्या काही वर्षापासून प्रत्येक ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. हे आपल्याला सर्रास दिसून येते. आजी, आजोबा, मुलगा, मुलगी, नातवंडे त्यांचा वावर आजच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये फारच कमी प्रमाणात दिसून येतो. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सर्वांना जे सामाजिक वातावरण मिळते, ते आता सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या कुटुंब पद्धतीत मिळत नाही.
जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती अजूनही चिरकाल टिकून आहे. असेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास कुडाळ तालुक्यातील नेरूर वाघचौडी माडयाचीवाडी येथील गावडे घराण्याचे देता येईल. गेली पाच पिढ्या असणाऱ्या या गावडे घराण्यांमध्ये ५२ कुटुंबियांचा हा गणपती असतो. गणपतीच्या दिवशी या देवघरांमध्ये सुमारे पाचशे ते साडे पाचशे माणसे या कालावधीत एकत्र येतात. ही सर्व ५२ कुटुंबे नेरुर वाघचौडी येथे वास्तव्य करतात. गणेशोत्सव कालावधीत ते माड्याचीवाडी येथे आपल्या मूळ देवघरच्या ठिकाणी जिथे श्री गणेशाचे पूजन होते, त्या ठिकाणी येतात. माड्याचीवाडी ग्रामपंचायत नजीक हे घराणे आहे. पाच दिवस मनोभावे सेवा अर्चा केली जाते. विशेष म्हणजे या गणपतीच्या पाचही दिवस स्थानिक भजनांना याठिकाणी प्राधान्य देण्यात येते. स्थानिक भजने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाचही दिवस होत असतात. आताची गावडे घराण्याची ही पाचवी पिढी असून या घराण्याचा गणपती गेली तीन पिढ्या नेरूर वाघोसेवाडी येथील मधुकर सडवेलकर या घराण्याकडे होता. त्यांच्याकडे गेल्या वर्षी दुःखद घटना घडल्याने आता श्रींची मूर्ती घडविण्याचे काम माडयाचीवाडी येथील गणेशमूर्तीकार धामपूरकर करतात. दरवर्षी गणेशाची एकच मूर्ती असते. ती मोठी असते. गेल्या पाच पिढ्यामध्ये गणेश मूर्ती आजतागायत बदललेली नाही. सुखदुःखाचे कार्य घडले तरी गणपती हा पाच दिवसाचाच असतो. ही परंपरा गेली पाच पिढ्या सुरू आहे.
----------------
कोट
दरवर्षी पाचशे ते साडेपाचशे माणसे या ठिकाणी पाच दिवस असतात. यामध्ये चाकरमान्यांची संख्या मोठया प्रमाणात असते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे गर्दीचे प्रमाण कमी होते. सर्व चाकरमान्यांनी आपआपल्या ठिकाणी थांबून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून श्रींचे दर्शन घेतले होते. यावर्षी चौथ्या व पाचव्या दिवशी सुमारे ७०० जणांची उपस्थिती असेल.
- शेखर गावडे, सरपंच, नेरूर
----------------
चौकट
ववसा कार्यक्रमास मोठा उत्साह
गावडे घराण्याचा ५२ कुटुंबियांचा हा गणपती सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र परिचित आहेच, शिवाय या घराण्याचा ववसा हा धार्मिक कार्यक्रम फार मोठा असतो. पाचव्या दिवशी ५२ कुटुंबातील सुमारे अडीशे महिला ववसा घेऊन या गणपतीच्या ठिकाणी येतात. सायंकाळी पाचपर्यंत हा कार्यक्रम चालतो. त्यानंतर महाप्रसाद होतो. रात्री उशिरा श्रींचे विसर्जन हे घरानजीक असणार्‍या नदीमध्ये केले जाते. हा भक्तिमय सोहळा संपण्यासाठी रात्रीचे अकरा ते बारा वाजतात. सुरुवातीला श्रींचे विसर्जन भक्तीमय वातावरणात केले जाते. त्यानंतर देवीचे विसर्जन केले जाते. या पाच दिवसाच्या कालावधीत काही अडचण आल्यास भाचे यांच्या माध्यमातून हा सोहळा साजरा केला जातो.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92316 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..