मराठा समाजबांधवांसाठी लवकरच ''बिझनेस फोरम'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा समाजबांधवांसाठी लवकरच ''बिझनेस फोरम''
मराठा समाजबांधवांसाठी लवकरच ''बिझनेस फोरम''

मराठा समाजबांधवांसाठी लवकरच ''बिझनेस फोरम''

sakal_logo
By

swt16.jpg
46983
पानवळः शिबिरात सुनीता आईर यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर. सोबत बाळू सावंत व इतर.

मराठा बांधवांसाठी लवकरच ''बिझनेस फोरम''
राजाराम सावंत यांचे प्रतिपादन; पानवळात विद्यार्थ्यांना दाखले वाटप
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः मराठा समाजातील मुलांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात मराठा समाजाच्या वतीने ''बिझनेस फोरम''ची निर्मिती करण्यात येणार आहे. याची माहिती गावागावांत मेळावे घेऊन देणार असल्याचे प्रतिपादन बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी येथे केले.
पानवळ येथील गोगटे -वाळके महाविद्यालयात मराठा समाजातील मुलांसाठी दाखले देण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी. बी. वारंग, संचालक सुभाष मोर्ये, मराठा समाजाचे माजी अध्यक्ष तथा पत्रकार नीलेश मोरजकर, खजिनदार राकेश परब, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. किशोर म्हेत्री, प्रा. रमाकांत गावडे, महा ई-सेवा केंद्राच्या संचालिका सुनीता आईर आदी मान्यवर उपस्थित होते.
सावंत म्हणाले की, मराठा समाजाची संख्या मोठी असल्याने नेहमीच समाजातील मुलांना आवश्यक शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे दाखले वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठीच महाविद्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अधिवास, डोमेसाईल, उत्पन्न दाखला यासंह इतर आवश्यक दाखले देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती सुनीता आईर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92323 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..