''सिंधुदुर्गचा राजा''ची उत्साहात प्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''सिंधुदुर्गचा राजा''ची उत्साहात प्रतिष्ठापना
''सिंधुदुर्गचा राजा''ची उत्साहात प्रतिष्ठापना

''सिंधुदुर्गचा राजा''ची उत्साहात प्रतिष्ठापना

sakal_logo
By

swt17.jpg
46984
कुडाळः ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीची विविधत पूजन करून प्रतिष्ठापनाप्रसंगी तहसीलदार अमोल पाठक. (छायाचित्रः अजय सावंत)

‘सिंधुदुर्गचा राजा’ची
उत्साहात प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात भक्तीमय वातावरणात, धुमधडाक्यात बुधवारी येथे ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीची विविधत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. या गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उत्सव कालावधीत भजने, फुगड्यांसह डबलबारी, दशावतारी नाटक तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात असणार आहे.
कुडाळ पोस्ट ऑफिस चौक नजिक भाजपा कार्यालयासमोरील पटांगणात माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून, सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्यावतीने सिंधुदुर्ग राजा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. सिंधुदुर्ग राजा गणेशोत्सवाचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. श्री गणेश चतुर्थी दिवशी सकाळी कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते सिंधुदुर्गचा राजा गणपतीचे विविधत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी नगराध्यक्ष व प्रतिष्ठित व्यापारी ओंकार तेली, जिल्हा कार्यकारीणी सदस्य आनंद शिरवलकर, राकेश कांदे, नागेश नेमळेकर, राकेश नेमळेकर, राजवीर पाटील, विश्वास पांगुळ आदींसह सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92324 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..