पानवळ महाविद्यालयात रानभाज्यांबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पानवळ महाविद्यालयात रानभाज्यांबाबत मार्गदर्शन
पानवळ महाविद्यालयात रानभाज्यांबाबत मार्गदर्शन

पानवळ महाविद्यालयात रानभाज्यांबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

swt112.jpg
47005
पानवळः रानभाज्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी भाज्यांची मांडणी केली होती. (छायाचित्र - नीलेश मोरजकर)

पानवळ महाविद्यालयात
रानभाज्यांबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ ः कोकणला वनसंपदेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. या वारशाचे जतन होणे हे आधुनिक काळात अत्यंत गरजेचे आहे. मानवी जीवनशैली बदलत आहे. यामध्ये आहाराबाबत मनुष्याने सजग राहणे आवश्यक आहे. निसर्गातील विविध रानभाज्या आपल्या आहारात आणून पौष्टिक व जीवनसत्व असलेल्या रानभाज्यांचा आस्वाद घेत आपले जीवन सुखकर करावे, असे आवाहन गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. वेल्हाळ यांनी येथे केले.
पानवळ येथील गोगटे वाळके महाविद्यालयात रानजाई निसर्ग मंडळाच्या वतीने रानभाज्या प्रदर्शन व त्याविषयीची शास्त्रीय माहिती याविषयी प्रदर्शन आयोजित केले होते. त्यावेळी डॉ. वेल्हाळ बोलत होते. कोकणच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये अनेक वनौषधी वृक्षांबरोबरच नानाविध रानभाज्यांचा खजिना या परिसरात सापडतो. येथील वातावरणाला पोषक व विविध जीवनसत्वे असणाऱ्या रानभाज्यांचा दररोजच्या आहारात वापर करावा, असे आवाहन यावेळी विविध वक्त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील विविध भाज्यांची सुबक मांडणी केली होती. प्रत्येक भाजीची लिखित संकलित माहिती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात भाज्यांची विक्री देखील करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. उमेश परब, प्रा. डॉ. अभिजित महाले यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शरद शिरोडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले. आभार प्रा. रश्मी काजरेकर यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92334 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..