राजापूर-राजापुरात मोकाट जनावरे पालिकेने पकडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापुरात मोकाट जनावरे पालिकेने पकडली
राजापूर-राजापुरात मोकाट जनावरे पालिकेने पकडली

राजापूर-राजापुरात मोकाट जनावरे पालिकेने पकडली

sakal_logo
By

राजापुरात पालिकेने पकडली मोकाट जनावरे
मालकांना दंड ; काही जनावरांचा केला लिलाव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. 1 ः शहरातील वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या मोकाट गुरांच्या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक पवित्रा घेतला आहे. मोकाट जनावरांना पकडून त्यांच्या मालकांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच काही जनावरांचा लिलाव करून दंडाची रक्कम वसूल केली आहे.
शहरामध्ये फिरत असलेल्या मोकाट गुरांचा त्यांच्या मालकांनी स्वतःहून बंदोबस्त करावा अन्यथा, दंडात्मक कारवाई करू असेही मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी स्पष्ट केले आहे. शहराला गेल्या अनेक वर्षापासून मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांच्या समस्येने भेडसावले आहे. शहरातील रहदारीच्या रस्त्यावरून जनावरे मोकाटपणे फिरत असल्याने त्याचा नागरीकांसह वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. शिवाय दिवसा आणि रात्रीच्या वेळी भर रस्त्यात जनावरे बसून राहत असल्याने त्याच्यातून अनेकवेळा अपघात होतात. त्यामुळे मोकाट जनावरांसह त्यांच्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी लोकांकडून केली जात होती. याबाबत वारंवार नगर पालिकेच्या बैठकीमध्ये चर्चा होऊनही ठोस कार्यवाही होत नव्हती. मुख्याधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोकाट जनावरांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मोकाट जनावरे पकडण्याचीही मोहीम राबविली. त्यामध्ये पकडलेल्या गुरांपैकी मालकांनी दंडात्मक रक्कम भरून पालिकेकडून सोडवून घरी नेली. उर्वरीत गुरांचा प्रशासनाने लिलाव करून दंडात्मक रक्कमेची वसुली केली. शहरामध्ये फिरणार्‍या मोकाट गुरांचा त्यांच्या मालकांनी स्वतःहून बंदोबस्त करावा, असे आवाहन मुख्याधिकारी भोसले यांनी केले आहे. मालकांनी कार्यवाही न केल्यास मोकाट गुरे पकडून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा भोसले यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92340 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..