राजापूर ः बालपणीचे स्वप्न पूर्ण करत बनले मूर्तीकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः बालपणीचे स्वप्न पूर्ण करत बनले मूर्तीकार
राजापूर ः बालपणीचे स्वप्न पूर्ण करत बनले मूर्तीकार

राजापूर ः बालपणीचे स्वप्न पूर्ण करत बनले मूर्तीकार

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat३०p१५.jpg ः L४७०२५राजापूर ः गणेशमूर्तीला रंगकाम करताना दीपक खांबल.
-rat३०p१६.jpg ःKOP२२L४७०२६ दीपक खांबल यांनी टाकाऊ काथ्याचा उपयोग करत तयार केलेल्या खेकड्याच्या प्रतिकृतीवर आसनस्थ गणेशमूर्ती.
----------------

बालपणीचे स्वप्न पूर्ण करत बनले मूर्तीकार
दीपक खांबल ; मूर्तिकलेच्या आवडीला व्यावसायिकेतेची जोड
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः घरामध्ये गणेशमूर्ती आणण्यासाठी कुटुंबीयांसमवेत लहानपणापासून कार्यशाळेमध्ये जात होतो. त्या वेळी मूर्ती कशी बनवतात याची उत्सुकता होती. अशी मूर्ती आपणच बनवली तर, अशा विचारातून प्रेरणा घेत शहरानजीकच्या धोपेश्‍वर खांबलवाडी येथील दीपक खांबल यांनी स्वहस्ते मातीची गणेशमूर्ती तयार करण्याला सुरवात केली. उपजत कलागुण, कौशल्याला निरिक्षण आणि व्यावसायिकतेची जोड देत गेल्या १६ वर्षाहून अधिक काळ ते श्री स्वामी कलाकेंद्रामध्ये शाडूच्या गणेशमूर्ती घडवत आहेत.
खांबल यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. पुढे चित्रकला जोपासता आली नाही तरी त्यांनी व्यावसायिकतेच्या माध्यमातून रंगकामाची आवड जोपासली. प्रथमच बनवलेल्या आकर्षक मूर्तीचे अनेकांनी कौतुक केले. त्यातून प्रेरणा घेत त्यांनी मूर्तिकलेच्या आवडीला व्यावसायिकेतेची जोड दिली आहे. कोणताही वारसा नसताना केवळ निरीक्षणातून त्यांनी घडवलेल्या मूर्ती खांबलवाडी, धोपेश्‍वर पन्हळे, विखारेगोठणे, गोवळ आदी गावांमधील गणेशभक्त घेऊन जात असल्याचे ते सांगतात. त्यांच्या श्री स्वामी कलाकेंद्र कार्यशाळेची आकर्षक रंगसंगती आणि विविधांगी पोझिशनमधल्या ’गणेशमूर्ती’ ही खासियत आहे. डोळ्यांची रेखणी, साजेसे लक्षवेधी रंगकाम हेही त्यांची वैशिष्ट्य आहे. गणेशमूर्तींची रंगसंगती आणि पोझिशन पाहताना गणेशभक्तांचे मन हरखून जाते. या प्रवासामध्ये हर्डी येथील मूर्तिकार विष्णू पड्यार, कैलास कोठारकर, आई-वडिलांसह चुलते सहदेव खांबल यांचे मार्गदर्शन आणि पत्नी दीक्षा यांचे सहकार्य लाभल्याचे सांगत त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


चौकट ः १
अशी बनली पहिली गणेशमूर्ती

मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणारी शाडूची माती चाळून त्यातील छोटे-मोठे खडे काढून नंतर तिचा मूर्ती बनवण्यासाठी प्रत्यक्ष वापर करायचा असतो, याची माहिती नव्हती. त्यामुळे आणलेल्या मातीचा तशाच स्थितीमध्ये वापर करत मूर्ती बनवण्याला दीपक यांनी सुरवात केली. मात्र, चार-पाच दिवस सातत्याने प्रयत्न करूनही प्रत्येकवेळी मूर्तीचा आकार पूर्ण होत नव्हता. त्यामध्ये मातीही फुकट जात होती. त्यानंतर, काही जाणकरांकडून माती चाळून त्यातील खडे बाहेर काढावेत आणि नंतर तिचा उपयोग करावा, असा सल्ला मिळाला. त्यानंतर, पुन्हा नव्याने माती आणून ती चाळून तिचा वापर केला. त्यानंतर, चार-पाच दिवसानी मूर्तीला परिपूर्ण आकार मिळाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92375 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..