रत्नागिरी ः जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना लाभांश जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना लाभांश जाहीर
रत्नागिरी ः जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना लाभांश जाहीर

रत्नागिरी ः जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना लाभांश जाहीर

sakal_logo
By

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचा लाभांश जाहीर
रत्नागिरी ः जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष परशुराम निवेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या वेळी सर्व तालुक्यातील सभासद उपस्थित होते. पहिल्या सत्रात पतसंस्थेतील सभासदांच्या पाल्यांचा प्रमाणपत्र, रोख रक्कम, भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार केला गेला. जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था रत्नागिरीचे 2016 ते 2022 या कार्यकारिणीतर्फे शामराव पेजे सभागृहाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अडीच फुटी प्रतिमा भेट देण्यात आली. दुसर्‍या सत्रात प्रत्यक्ष सभा पार पडली. अनेक विषयांवर सभासदांनी उत्स्फूर्त चर्चा केली, प्रश्नोत्तरे झाली. या सभेत सभासदांना लाभांश जाहीर करण्यात आला. या सभेवेळी प्रशांत कांबळे, कमलेश कमतेकर, समीर इंदुलकर, राम ठाकूर, संजय कांबळे, विवेक गावडे, प्रभाकर कांबळे, राजेंद्र रेळेकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92378 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..