पुरस्काराचे 10,000 दिले दोन संस्थाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरस्काराचे 10,000 दिले दोन संस्थाना
पुरस्काराचे 10,000 दिले दोन संस्थाना

पुरस्काराचे 10,000 दिले दोन संस्थाना

sakal_logo
By

पुरस्काराचे १०हजार दिले दोन संस्थाना
देवरूख,ता.२ ःज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सेवा दल सैनिक सुहास कोते यांना परिवर्तन संस्था मुंबईचा ''सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार'' मिळाला. या पुरस्काराची अर्धी रक्कम रुपये ५००० त्यांनी मातृमंदिरच्या गोकुळ बालगृहासाठी देणगी जाहीर केली.''पुरस्काराच्या रकमेवर माझा अधिकार नाही, अर्धी रक्कम मातृमंदिर गोकुळसाठी अशा शब्दात सुहास कोते यांनी भावना व्यक्त केल्या.यासह त्यानी कल्याण येथील डंम्पिग ग्राऊंडच्या साठेनगर मधील कचरा वेचणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या अनुबंध संस्थेला ५ हजार मदत निधी दिला.
पुरस्कार निमित्ताने महम्मद खडस व मनोहर कदम यांचे स्मरण करीत आणि गजानन खातू व संजीव साने या मार्गदर्शक आणि सहकार्याचा विशेष उल्लेख केला. ज्यांनी सेवा दलाची प्रेरणा दिली, अन् सामाजिक कामात आलो, त्या सेवा दलाच्या साथी अनंत जोशी यांचे स्मरण करुन त्यांना हा पुरस्कार समर्पित केला. मुंबईत राहून मातृमंदिरच्या कामात नेहमीच शक्य ती सर्व मदत करणाऱ्या कोते यांनी मातृमंदिरच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिले होते. मातृमंदिर परिवाराकडून सुहास कोते यांचे या पुरस्कारासाठी अभिनंदन करण्यात आले. देणगीबद्दल त्यांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92381 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..