खारेपाटण येथे विज्ञान प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारेपाटण येथे विज्ञान प्रदर्शन
खारेपाटण येथे विज्ञान प्रदर्शन

खारेपाटण येथे विज्ञान प्रदर्शन

sakal_logo
By

खारेपाटण येथे विज्ञान प्रदर्शन
खारेपाटण: येथील शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालयात १२ व १३ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे. याबाबतची माहिती हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी दिली. शालेय शिक्षण विभाग आणि पंचायत समिती कणकवली यांच्यावतीने विज्ञान प्रदर्शन होणार आहे. यात कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक सहभाग घेणार आहेत. या विज्ञान प्रदर्शनामध्ये वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत यश मिळविणारे स्पर्धक जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता पात्र ठरणार आहेत. तर विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात येणारी विविध शाळांची मॉडेल तज्‍ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पाठविण्यात येणार आहेत. कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी येथील हायस्कुलमध्ये १९८२ मध्ये कणकवली तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविले होते. आज पुन्हा एकदा तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा हे विज्ञान प्रदर्शन भरविण्याचे व त्याचे आयोजन करण्याची संधी खारेपाटण हायस्कुलला मिळाली आहे अशी माहिती प्रवीण लोकरे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92387 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..