राजापूर-राजापूर अर्बन बॅंकेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापूर अर्बन बॅंकेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश
राजापूर-राजापूर अर्बन बॅंकेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश

राजापूर-राजापूर अर्बन बॅंकेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश

sakal_logo
By

राजापूर अर्बन बॅंकेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश

सर्वसाधारण सभेत घोषणा ; साखरीनाटे शाखेचा विशेष गौरव

राजापूर, ता. १ : कोरोना महामारीसह अन्य विविध समस्यांना सामोरे जाताना बॅकिंग व्यवसायामध्ये लक्षवेधी कामगिरी केल्याबद्दल राजापूर अर्बन बँकेच्या वाषिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक मंडळासह मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह कर्मचारीवृंदांचे सभासदांनी विशेष कौतुक केले. तसेच सभासदांना दहा टक्के लाभांश देणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर यांनी जाहीर केले.
सर्वसाधारण सभा राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहामध्ये चेअरमन श्री. अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपाध्यक्ष सुनील जाधव, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत सुतार, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, प्रसन्न मालपेकर आदी उपस्थित होते.
मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचन केल्यानंतर बँकेच्या आर्थिक वर्षातील उलाढाली, ठेवी, कर्जे यांविषयी चर्चा करताना सभासदांनी बँकेच्या कामकाज अन् प्रगतीच्यादृष्टीने विविधांगी सूचना केल्या. माजी संचालक दिनानाथ कोळवणकर यांनी बोलताना कर्ज व ठेवी यांच्यामध्ये समतोल साधताना, कर्जे, ठेवी यांच्यासह बँकेच्या स्वनिधीमध्ये वाढ व्हावी अशी सूचना केली. रवींद्र नागरेकर, सुशांत मराठे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी बँकेच्या प्रगतीमध्ये पिग्मी एजंटांचे योगदान लक्षात घेता त्यांना कर्मचारी भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना मांडली. विविध विषयांवर उल्हास खडपे, लियाकत काझी, श्रृती ताम्हणकर, मलीक गडकरी, मंदार सप्रे, रविकांत भामत आदी सभासदांनी चर्चेमध्ये भाग घेतला.
अध्यक्ष श्री. अभ्यंकर यांनी सभासदांनी केलेल्या सूचनांवर संचालक मंडळामध्ये चर्चा करून योग्य ते निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अहिरे यांनी बँकेच्या सद्यस्थितीतील वाटचालीसह भविष्यातील ध्येयधोरणांसंबंधी सविस्तर माहिती दिली. शून्य टक्के थकबाकी राखण्यात यशस्वी ठरलेल्या साखरी नाटे शाखेच्या शाखाधिकार्‍यांसह सहकारी कर्मचार्‍यांचे बँकेचे माजी अध्यक्ष अनिलशेठ ठाकूरदेसाई यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92391 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..