दीपक लोंढे यांना बढती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपक लोंढे यांना बढती
दीपक लोंढे यांना बढती

दीपक लोंढे यांना बढती

sakal_logo
By

swt११९.jpg
४७०३७
दीपक लोंढे

दीपक लोंढे यांना बढती
सावंतवाडीः बांदा पोलिस ठाण्याचे हवालदार दीपक लोंढे यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी गणेशोत्सवात ही खास भेट दिल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. सिंधुदुर्ग पोलिसमध्ये १९ नोव्हेंबर १९९१ मध्ये भरती झालेल्या दीपक लोंढे यांची ३१ वर्षे सेवा झाली असून त्यांना पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे. पोलिस अधीक्षक यांचे अंगरक्षक म्हणून दोन वर्षे सेवा बजावली आहे. तसेच ओरोस पिलीस ठाण्यात सहा वर्षे, जिल्हा विशेष शाखा पोलिस अधीक्षक कार्यालयात पाच वर्षे, सावंतवाडी पोलिस ठाण्यात ६ वर्षे, वेंगुर्ले पोलिस ठाण्यात पाच वर्षे, सावंतवाडीत तीन वर्षे आणि सध्या ते बांदा पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी जिल्ह्यातील पोलिस दलात बढत्या केल्या आहेत. त्यात लोंढे यांचा समावेश आहे.
...............
swt१२०.jpg
47038
पणदूरः संविता आश्रमातील कर्मचाऱ्यांनी तनिष्काचा वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमात फळे वाटप
साटेली भेडशीः वाढदिवस म्हटले की आपण दरवर्षीप्रमाणे मेणबत्ती, केक अशा वस्तूंनी सुरुवात करत मांसाहारी जेवणाच्या पार्टीचा आनंद घेत साजरा करतो; परंतु ही संकल्पना फक्त स्वतःच्या मनोरंजनापुरती मर्यादित असते. यातून काही सामाजिक संदेश देण्याचा विचार करत माणुसकी कशी जिवंत करता येईल, याकडे लक्ष वेधले दहा वर्षांच्या तनिष्का भोसले हिने. वडील जिल्हा परिषद शिक्षक, आई गृहिणी तसेच एक लहान बहीण असे छोटे कुटुंब असलेल्या तनिष्काने आपण समाजाला काहीतरी दान करून सामाजिक संदेश देण्यासाठी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा अट्टहास धरला आणि तो वडिलांनीही पूर्ण केला. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करून तनिष्काने आपला वाढदिवस साजरा केला. यावरच न थांबता संविता आश्रम पणदूर-कुडाळ येथील वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू व फळे वाटप करून समाजाला माणुसकीची जाणीव करून देत आपण देखील समाजाचे काही देणे लागतो, हे पटवून दिले. अवघ्या दहा वर्षांच्या मुलीची एवढी सुंदर संकल्पना असल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92407 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..