रत्नागिरी-हवामानातील बदलांना सामोरे जाणार युवा पिढी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-हवामानातील बदलांना सामोरे जाणार युवा पिढी
रत्नागिरी-हवामानातील बदलांना सामोरे जाणार युवा पिढी

रत्नागिरी-हवामानातील बदलांना सामोरे जाणार युवा पिढी

sakal_logo
By

फोटो ओळी
rat१p४.jpg- KOP२२L४६९७५रत्नागिरी ः पटवर्धन हायस्कूलमध्ये झालेल्या शिबिरात सहभागी युवक-यवुती
---------------
हवामान बदलांना सामोरे जाणार युवा पिढी

युनिसेफचा उपक्रम ; प्रत्येक जिल्ह्यात मार्गदर्शन शिबिरे
रत्नागिरी, ता. १ ः हवामान बदलाचे २१ व्या शतकात मोठे आव्हान आहे. ऋतुचक्रात होणारे बदल, उष्णतेच्या लाटा, पूर, चक्रीवादळे अशा नैसर्गिक आपत्तींची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याला सामोरे जाण्यासाठी युवा पिढीला सज्ज करण्यासाठी युनिसेफ (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड) आणि पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्राने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मार्गदर्शन शिबिरे घेण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीत झालेल्या शिबिरात महाविद्यालयीन युवक, युवतींनी सहभाग घेतला.

युनिसेफ आणि पर्यावरण शिक्षण केंद्रमार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी हवामानबदलविषयक एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृहात झाले. कार्यशाळेचे आयोजन जागतिक युथ क्लायमेट ऍक्शन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन (एमवायसीए) या प्रकल्पांतर्गत केले होते. हवामान बदलाचे हे परिणाम पुढील पिढ्यांना अधिकच तीव्रतेने सहन करावे लागणार आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर संसाधनांच्या अमर्याद वापरामुळे हे संकट उभे ठाकले आहे. जागतिकस्तरावर हवामान बदलाविषयी युवक-युवतींची भूमिका सध्या महत्वाची ठरत आहे. याविषयी युवकांना जागरूक करणे आणि स्थानिक पातळीवरील समस्यांची दखल धोरणकर्त्यांनी घ्यावी यादृष्टीने तयार केली जात आहे. रत्नागिरी शहरात झालेल्या कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध स्वयंसेवी संस्थामधील युवक सहभागी झाले होते. या कार्यशाळेत हवामानबदल, हवामानबदलाचा शेती, जैवविविधता, आरोग्य, यावर होणारा परिणाम, हवामानबदलामुळे येणार्‍या विविध नैसर्गिक आपत्ती, किनारी भागातील कचरा व्यवस्थापन, जलसुरक्षा यातील आव्हाने आदी विषयांवर माहिती देण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी हवामानबदलामुळे येणार्‍या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी स्थानिक पातळीवर काय करता येईल यासंदर्भात युवकांना मार्गदर्शन केले. युनिसेफचे बालाजी व्हरकट, प्रियांका शेंडगे आणि पर्यावरण शिक्षण केंद्राचे कुणाल जयस्वाल, अवधूत अभ्यंकर, बसवंत ढुमणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हवामान बदलाच्या विरुद्ध लढ्यात युवक-युवतींची भूमिका काय असू शकते यावर कार्यशाळेमध्ये चर्चा करण्यात आली. सहभागी युवक-युवतींनी यासाठी आपल्या स्थानिक पातळीवर राबवता येतील अशा कृती कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, सचिव सुनील वणजू यांचे सहकार्य लाभले.


युवकांमध्ये जागृतीचा उद्देश
स्थानिक पातळीवर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आणि सध्याच्या हवामानबदलासाठी अनुकूल असे बदल जीवनपद्धतीत करणे यासाठीही युवक-युवती महत्वाची भूमिका बजावू शकतात. एमवायसीए कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये युवकांसाठी कार्यशाळा घेतल्या जात आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92419 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..