रत्नागिरी-निवेंडीकडे जाणारी एसटी बसेस बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-निवेंडीकडे जाणारी एसटी बसेस बंद
रत्नागिरी-निवेंडीकडे जाणारी एसटी बसेस बंद

रत्नागिरी-निवेंडीकडे जाणारी एसटी बसेस बंद

sakal_logo
By

निवेंडीकडे जाणारी एसटी बंद
गणेशोत्सवातही गैरसोय; अधिकाऱ्यांविरोधात नाराजी
रत्नागिरी, ता. २ः तालुक्यातील निवेंडीकडे जाणारी एसटी सुरू करण्यास परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील दाखवला जात नाही. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात येथील ग्रामस्थांची पंचाईत झाली आहे.
गणपतीपुळे पर्यटन क्षेत्राशेजारी निवेंडी हे गाव आहे. या गावातून जाणार रस्ता हा जयगड-निवळी रस्त्यावरील निवेंडी फाटा ते गणपतीपुळे आणि मालगुंड गावांना जोडतो. साधारण ८० - १०० वर्ष जुना रस्ता एकेरी पण सुस्थितीत आहे. या रस्तावर एका ठिकाणी काही भाग खचला असल्याचे कारण दाखवत दोन महिन्यांपूर्वी येथील एसटी सेवा बंद केली होती. एसटी बंद केल्याची माहिती प्रशासनाकडून ग्रामपंचायत वा सार्वजनिक बांधकामाला कळविलेले नाही. ग्रामस्थांनी चौकशी केल्यावर ही कारणे एसटी अधिकार्‍यांकडून सांगण्यात आली. त्याची पूर्तता झाल्यावरही एसटी सेवा अजुनही सुरू करण्यात आलेली नाही. याबाबत पुन्हा चौकशी केली असता परिवहन उपविभागाकडून सर्व्हे करण्याचा फार्स झाला. त्यामध्ये नव्याने डागडुजी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांचीही पूर्तता बांधकाम विभागाकडून केली. तरीही परिवहन उपविभागाच्या अधिकाऱ्यांकडून एसटी सुरू केलेली आहे. गणपतीच्या सणादरम्यान निवेंडी हे गाव एसटी सेवेपासून वंचित ठेवले आहे. येथील ग्रामस्थांना खासगी वाहनांमधून मुख्य बाजारपेठेकडे यावे लागत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92438 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..