राजापूर- चाकरमान्यांच्या स्वागतासाठी शिक्षक वेठीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर- चाकरमान्यांच्या स्वागतासाठी शिक्षक वेठीला
राजापूर- चाकरमान्यांच्या स्वागतासाठी शिक्षक वेठीला

राजापूर- चाकरमान्यांच्या स्वागतासाठी शिक्षक वेठीला

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat१p१२.jpg-KOP२२L४७००१ सावंतवाडी ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देताना शिक्षक समितीचे पदाधिकारी.
- rat१p१३.jpg- २L४७००२ चाकरमान्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांची नियुक्ती.
----------------

चाकरमान्यांच्या स्वागतासाठी शिक्षक वेठीला
शिक्षक समितीचा विरोध ; शिक्षणमंत्री केसरकर यांना निवदेन
राजापूर, ता. १ ः राजापूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्र काढून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे बसस्थानकावर स्वागत, चहापाणी आणि वाहन व्यवस्था पाहण्यासाठी तलाठ्यांच्या अधिनस्थ शिक्षकांच्या नियक्त्या केल्या आहेत. हे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन आहे. ३९ शिक्षकांना एसटी आगारात ड्युटी दिली आहे. चाकरमान्यांचे नियोजन करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची ड्युटी लावणे रद्द करण्याची मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे करण्यात आली. यासह अशैक्षणिक कामे रद्द करण्यासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले.
सावंतवाडी येथे जाऊन हे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष उदय शिंदे, उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हा शिक्षक अमितकुमार पंडित, जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, प्रकाश परवडे आदी उपस्थित होते. रोज तीन शिक्षक राजापूर एसटी आगारात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत असतील. एक शिक्षक रोज आठ तास ड्युटी करेल. त्यानंतर पुढील १३ दिवसांमध्ये त्याला अशा प्रकारचं काम लागणार नाही. तसेच, सुट्टीसाठी जिल्हा बाहेर न गेलेले. शिवाय राजापूरपासून जवळच असलेल्या शिक्षकांची ड्युटी याठिकाणी लावण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षक नेत्यांनी दिली.
राजापूर तालुक्यात जवळपास ८५० शिक्षक आहेत. यापैकी ३९ शिक्षकांची ड्युटी ही राजापूर आगार येथे लावण्यात आली आहे. यावर शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. शिक्षक पदाचा उपमर्द करणारे आदेश काढणाऱ्‍या यंत्रणेचा राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जाहीर निषेध केला आहे. शिक्षकांकडे सोपविलेल्या अशैक्षणिक कामाचे वरील दोन्ही पत्र तात्काळ रद्द करण्याचे आदेशित करावे आणि असे पत्र देऊन शिक्षक हक्क कायद्याचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण मंत्री केसरकर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.


शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचा भंग
मागील काही दिवसात वेगवेगळ्या विभागांनी शिक्षकांना कोणते काम द्यावे आणि कोणते काम देऊ नये याचा विवेकाने विचार न करता अनाकलनीय, अतार्किक आणि शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचा भंग होणारी कामे देणारे आदेश निर्गत केले आहे. शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय यंत्रणा शिक्षण हक्क कायद्याचा भंग करीत इतर विभागाकडून दिल्या जाणार्‍या अशैक्षणिक कामांच्या बाबत काहीच बोलायला तयार नाही, याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92444 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..