योगासन स्पर्धेत कासार्डेचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगासन स्पर्धेत कासार्डेचे वर्चस्व
योगासन स्पर्धेत कासार्डेचे वर्चस्व

योगासन स्पर्धेत कासार्डेचे वर्चस्व

sakal_logo
By

swt122.jpg
47061
ओरोसः जिल्हास्तरीय योगा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंसोबत मान्यवर.

योगासन स्पर्धेत कासार्डेचे वर्चस्व
ओरोसमध्ये आयोजन ः विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १ ः महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व बृहन्महाराष्ट्र योग प्रसाद यांच्यावतीने ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा योगासने स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कासार्डे येथील योगा खेळाडूंनी सर्व गटात वर्चस्व गाजवले.
पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी धोत्रे, कृषी कॉलेजचे संचालक सुशांत नाईक, योग समन्वयक सिंधुदुर्ग जिल्हा डॉ. तुळशीराम रावराणे आदी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी कासार्डेच्या हर्ष घाडीगावकर व वेंगुर्लेची मारिया अल्मेडा यांनी सादर केलेल्या योगासनांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण, राज्य पंच संजय भोसले, क्रीडा शिक्षक संदेश तुळसणकर, संजय पेंडुरकर, जयश्री कसालकर, स्पर्धा संयोजक प्रियंका सुतार, तेजल कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेला जिल्हाभरातून विविध योग केंद्राचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल अनुक्रमे असा- 9 ते 14 वर्षे : ट्रॅडिशनल योगासने मुली-काव्या गोंडवळकर, दूर्वा पाटील (कासार्डे हायस्कूल), श्रेया डोईफोडे, अश्मी राव, शमिका चिपकर. मुले-कल्पेश निकम (कासार्डे हायस्कूल), कुणाल गोंडवळकर, हर्षल कनुरकर, वैभव वराडकर, दुर्गेश साटम. 14 ते 18 वयोगट ट्रॅडिशनल योगासने ः मुली-सानिका मत्तलवार, रिया नकाशे (दोघी कासार्डे ज्युनियर कॉलेज), निकिता लाड, नेहा पाताडे (कासार्डे कॉलेज), सिध्दी मोरजकर. मुले-गंधार नाईक, हर्ष घाडीगावकर, मयूर हडशी (तिघेही कासार्डे). 18 वर्षांवरील मुलींचा खुलागट-ट्रॅडिशनल योगासने ः मुली-मारिया अल्मेडा (वेंगुर्ले), चैताली पेंडुरकर (कट्टा), स्वाती गोडवे, मीनल राऊळ. मुले-लक्ष्मण सदडेकर (सावडाव). आर्टिस्टिक योगासने प्रकार-सिंगल मुली ः 9 ते 14 वयोगट- दुर्वा पाटील (कासार्डे हायस्कूल) विजेती. सिंगल मुलगे ः 9 ते 14 वयोगट-कल्पेश निकम (कासार्डे हायस्कूल) विजेता. सिंगल मुली ः 14ते 18 वयोगट मुली- नेहा पाताडे (कासार्डे) विजेती. सिंगल मुलगे ः 14 ते 18 वयोगट मुलगे-
गंधार नाईक, हर्ष घाडीगावकर, मयूर हडशी (सर्व कासार्डे). 18 वर्षावरील खुला वयोगट मुली- मारिया अल्मेडा(वेंगुर्ले) विजेती.
आर्टिस्टिक पेयर योगासने प्रकार ः 14 ते 18 वयोगट मुली-सानिका मत्तलवार व रिया नकाशे (कासार्डे). स्पर्धेत महाराष्ट्र असोसिएशनचे संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंच रवींद्र पावसकर, नीता सावंत, जे. डी. पाटील, रावजी परब, संजय पेंडुरकर आदींनी काम पाहिले. तर वेळाधिकारी आणि तांत्रिक सहाय्यक म्हणून श्वेता गावडे आणि विवेक राणे यांनी कामगिरी पार पाडली. या स्पर्धेची जनरल चॅम्पियनशिप कासार्डे योगासन केंद्राने पटकाविली. हे सर्व यशस्वी खेळाडू राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरले असून ते राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विजेत्या खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा योगासने स्पोर्ट असोसिएशनच्य़ा जिल्हाध्यक्षा डॉ. वसुधा मोरे, समन्वयक डॉ. तुळशीराम रावराणे, उपाध्यक्ष शेखर बांदेकर, खजिनदार तथा जिल्हा उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्यासह अन्य सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92450 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..