विजयदुर्ग-अर्नाळा बस मंगळवारपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयदुर्ग-अर्नाळा बस मंगळवारपासून
विजयदुर्ग-अर्नाळा बस मंगळवारपासून

विजयदुर्ग-अर्नाळा बस मंगळवारपासून

sakal_logo
By

विजयदुर्ग-अर्नाळा
बस मंगळवारपासून
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ः तालुक्यातील विजयदुर्ग आगारातून विजयदुर्ग-अर्नाळा गाडी सोडण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. ६) पासून गाडी सोडण्यात येणार आहे. या गाडीचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन भाजपच्या पडेल मंडल विभागाचे शक्तिकेंद्र प्रमुख ग्रेसिस फर्नांडीस (विजयदुर्ग) यांनी केले आहे.
याबाबत फर्नांडीस यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विजयदुर्ग आगाराची मंगळवारपासून जादा गाड्या आरक्षणानुसार सोडण्यात येणार आहेत असे आगारप्रमुख वैभव पडोळे यांच्याकडून समजले. यापूर्वी सागरी महामार्गावर विजयदुर्ग-विरार ही फेरी सुरु होती. हंगामामध्ये तसेच गणेश चतुर्थी सणाला जादा गाड्या सोडण्याचे संकेत एसटीकडून मिळाले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात चाकरमानी राहत असल्याने त्यादृष्टीने ही फेरी सोयीची आहे. विजयदुर्गपासून पडेल कँटीन, वाडा, तिर्लोट, आंबेरी, वाघोटण, सौंदाळे तसेच राजापूर तालुक्यातील कात्रादेवी, शिरसे, जैतापूर, पूर्णगड या भागातील नोकरी निमित्ताने कोकणी वस्ती वसई, बोरीवली, नालासोपारा, मिरारोड, दहिसर, भाईंदर या भागात वास्तव्यास आहेत. ही फेरी सायंकाळी ४.४५ वाजता विजयदुर्ग येथून सुटुन पडेल कँटीन, कात्रादेवी, रत्नागिरी, चिपळूण मार्गाने अर्नाळा अशी जाईल. पुन्हा याचमार्गे गाडी परतेल. या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92453 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..