रत्नागिरी- क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- क्राईम पट्टा
रत्नागिरी- क्राईम पट्टा

रत्नागिरी- क्राईम पट्टा

sakal_logo
By

बोट उलटल्याप्रकरणी तांडेलवर गुन्हा
रत्नागिरी ः काही दिवसांपूर्वी मांडवी मुखाजवळ समुद्राच्या पाण्यात बोट बुडून उवेस अंजुम मक्की (२१, रा. जयगड) या खलाशाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोट तोंडी कराराने घेतलेल्या खलील अयुब सोलकर (३६) आणि मुख्य तांडेल फहिम फाईक शेख (१९, दोन्ही रा.जयगड, रत्नागिरी) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खलील सोलकर यांनी बोटीचे मुळ मालक इम्रान सोलकर यांच्याकडून परवाना नसलेली बोट तोंडी कराराने ताब्यात घेतलेली होती. ती बोट समुद्रात चालवण्यायोग्य आहे की नाही, याची खात्री न करता २१ ऑगस्टला मुख्य तांडेल फहिम शेख दुय्यम तांडेल आफशान मुजावर, खलाशी अय्याज माखजनकर, हुजेफा मुल्ला आणि उवेश मक्की यांना सोबत घेऊन निष्काळजीपणे समुद्रात गेले होते. दरम्यान बोट राजीवडा खाडीतून समुद्रात नेत असताना मांडवी मुखाजवळ समुद्रातील उंच लाटांमुळे अपघात होऊन बोट समुद्रात बुडाली होती. त्यावेळी बोटीतील उवेस मक्कीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
--------
१७ हजार फसवणूक प्रकरणी गुन्हा
रत्नागिरी ः पुणे येथील इलेक्ट्रीक दुचाकीच्या केअर सेंटर मधून बोलत असल्याचे सांगून दुचाकीची वाढीव रक्कम गुगुल पे वरून घेऊन १७ हजार ८०६ रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण पांडे (रा. पुणे) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३० ऑगष्टला सव्वा चारच्या सुमारास साईमंदिर च्या मागे आदर्श वसाहत रत्नागिरी येथे घडली. संदीप पद्माकर नांदगावकर (वय ५१, रा. आदर्श वसाहत, रत्नागिरी) यांनी पुणे येथील ओला कंपनी येथून ऑनलाईल इलेक्ट्रीक दुचाकी १ लाख ५० हजाराला विकत घेतली होती. त्या दुचाकीचे वायरंगी उंदराने कुरतडल्याने ती बंद पडली. याप्रकरणी त्यांनी ओला कंपनीत तक्रार नोंदविली होती. ३० ऑगस्टला त्यांना सर्व्हिस केअर पुणे येथून फोन आला. त्याच क्रमांकावर नांदगावकर यांनी फोन केला असता संशयित प्रवीण पांडे बोलत आहे, असे सांगितले. दुचाकीच्या इन्शुरन्सची चौकशी केली आणि पांडे यांनी अधिक पैसे भरण्याची मागणी केली. त्यानंतर त्याने गुगल पे वरुन लिंक वरुन रक्कम पाठविण्यास सांगितले. नांदगावकर यांनी १७ हजार ८०६ रुपये पाठवून दिले. त्यानंतर ओला कंपनीतून फोन आला की तुमच्या दुचाकीसाठी १२ ते १३ हजार खर्च येईल, इन्शोरन्स करावा लागेल, असे सांगितले त्यावेळी नांदगावकर यांनी दोन तासापूर्वी प्रवीण पांडे नावाने फोन आला तेव्हा रक्कमही भरली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पांडे हा कंपनीचा कर्मचारी नसल्याचे निदर्शनास आले.
फसवणूक झाल्याने नांदगावकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित पांडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुर्य करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92480 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..