खेड-चार गावांतील मंदिरात दानपेट्या फोडल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-चार गावांतील मंदिरात दानपेट्या फोडल्या
खेड-चार गावांतील मंदिरात दानपेट्या फोडल्या

खेड-चार गावांतील मंदिरात दानपेट्या फोडल्या

sakal_logo
By

-rat1p19.jpg -
47078
तिसे : येथील ग्रामदैवतेच्या मंदिरातील दानपेटी फोडताना सिसीटीव्हीत कैद झालेला चोरटा


चार गावांच्या मंदिरांतील
दानपेट्या फोडल्या

खेड तालुक्यात प्रकार; चोरटे सीसीटीव्हीत कैद

खेड, ता. १ : तालुक्यात गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच चोरट्यांनी ग्रामदेवतांच्या मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारण्यास सुरुवात केल्याने गणेशोत्सवाच्या आनंदाला गालबोट लागले आहे. रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी एकाच रात्रीत कोरेगाव, चिंचघर, धामणी आणि तिसे येथील मंदिरातील दानपेट्या फोडून दानपेटीतील रक्कम लांबवली. चिंचघर येथील भैरवनाथ मंदिर आणि धामणी येथील झोलाई मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे बंदिस्त झाले आहेत.
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहावयास मिळत आहे. या उत्सवानिमित्त ठिकठिकाणी वेगवेळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. काही गावांमध्ये, भजन, कीर्तन तर काही ठिकाणी जाखडी नृत्याचे सामने रंगत आहेत. ग्रामस्थ गणेशोत्सवादरम्यान आयोजित कार्यक्रम पाहण्यात दंग असल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी दानपेट्या फोडल्या. दोन दिवसांपूर्वी एकाच रात्रीत चोरट्यांनी कोरेगाव येथील धावजी बाबा मंदिर, चिंचघर येथील भैरवनाथ मंदिर, तिसे येथील काळकाई मंदिर आणि धामणी येथील झोलाई मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारला आहे. सकाळी ही बाब पुजाऱ्याच्या निदर्शनास आल्यावर पुजाऱ्यांनी ग्रामस्थांना खबर दिली. गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात सुरू असतानाच चोरट्यांनी ग्रामदेवतांच्या दानपेट्या फोडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. चिंचघर येथील भैरवनाथ मंदिर आणि धामणी येथील झोलाई मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे बंदिस्त झाले आहेत. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने चोरट्यांचा माग काढण्याच्या प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागलेले नाहीत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92485 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..