खेड-दीड दिवसांच्या गणरायांना भक्तिभावाने निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-दीड दिवसांच्या गणरायांना भक्तिभावाने निरोप
खेड-दीड दिवसांच्या गणरायांना भक्तिभावाने निरोप

खेड-दीड दिवसांच्या गणरायांना भक्तिभावाने निरोप

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat1p21.jpg- KOP22L47084
खेड ः मुरडे येथे नारिंगी नदीच्या घाटावर बाप्पांना विसर्जनासाठी नेताना ग्रामस्थ.
---------------

दीड दिवसांच्या गणरायांना भक्तिभावाने निरोप
मिरवणुकीने विसर्जन ; गणेशघाटावर गणेशभक्तांची गर्दी
खेड, ता. १ : घरी आलेल्या बाप्पांची मनोभावे सेवा करून आज दीड दिवसांच्या गणरायांना भक्तिभावाने निरोप दिला. विसर्जन घाटावर बाप्पाना निरोप देण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत जगबुडी आणि नारिंगी नदी किनारी विर्सजन सोहळा सुरू होता. खेड पोलिसांनी गणेश घाटांवर चोख बंदोबस्त ठेवला होता.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी ,लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा घोषणा देत सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गणरायांच्या विसर्जन मिरवणूका निघाल्या, ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत गणरायांच्या विसर्जनाच्या मिरवणुका गणेश घाटाकडे सरकत होत्या. विसर्जन मिरणुकीत सहभागी झालेले गणेशभक्त बेधुंद होऊन नाचत होते.
जगबुडी आणि नारिंगी नदीच्या विसर्जन घाटावर नगरपालिका प्रसाशनाने विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. विसर्नाजदरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जीवन रक्षक तैनात करण्यात आले होते. विसर्जन घाटावर विजेचे प्रखर दिवेही लावण्यात आले होते. विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92492 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..