खेड- प्राथमिक शिक्षकाना आदर्श शिक्षक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड- प्राथमिक शिक्षकाना आदर्श शिक्षक पुरस्कार
खेड- प्राथमिक शिक्षकाना आदर्श शिक्षक पुरस्कार

खेड- प्राथमिक शिक्षकाना आदर्श शिक्षक पुरस्कार

sakal_logo
By

नऊ प्राथमिक शिक्षकाना आदर्श शिक्षक पुरस्कार
डॉ. इंदुराणी जाखड ; कला, क्रीडा विभागातून प्रस्तावच नाही
रत्नागिरी, ता.१ ः जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी जाहीर केले. प्रत्येक तालुक्यातील एक या प्रमाणे ९ शिक्षकांची नावे जाहीर झाली आहेत; मात्र कला, क्रीडा क्षेत्रातून एकही प्रस्ताव न आल्यामुळे विशेष पुरस्काराला कात्री लावण्यात आली आहे.
यावेळी शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, आर. के. कांबळे, श्रीमती कोतवडेकर आदी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी पुरस्कारांचे वितरण होते. निवडलेल्या शिक्षकांची नावे मंजुरीसाठी कोकण आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आली. त्या यादीला मान्यता मिळाल्यानंतर गुरूवारी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये पुंडलिक शिंदे (शिपोले, ता. मंडणगड), मुस्ताक तांबे (उर्दु शाळा विसापूर, दापोली), संतोष देवघरकर ( कर्जी, ता. खेड), प्रांजली चव्हाण (मांजरेकोंड, ता. चिपळूण), माधवी पाटील ( कुडली नं. ४, ता. गुहागर ), सुनील बोडेकर (हरपुडे नं. २, ता. संगमेश्वर), दिलीप भांडावले (पावस नालेवठार, रत्नागिरी), मृगया मोरे (जिल्हा परिषद शाळा येरवंड, लांजा), लक्ष्मण घाडीगावकर (सागवे कात्रादेवी, राजापूर) यांचा समावेश आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुर्वी एक वेतनवाढ दिली जात होती; मात्र ती रद्द करण्यात आली.आता पाचशे रुपये रोख, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

चौकट
पुरस्कार वितरण लांबणीवर

शिक्षक दिनापूर्वी पुरस्कार जाहीर झाले असले तरीही शिक्षक दिनी (ता. ५) त्याचे वितरण होणार नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार वितरण पुढे ढकलण्यात आले आहे. सध्या जिल्हा परिषदेत पदाधिकारी नाहीत, प्रशासक असल्यामुळे स्थानिक मंत्र्यांच्या उपस्थितीत याचे वितरण होईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92507 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..