साडवली- देवरुख-संगमेश्वरला गणेशमूर्तींचे विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली- देवरुख-संगमेश्वरला गणेशमूर्तींचे विसर्जन
साडवली- देवरुख-संगमेश्वरला गणेशमूर्तींचे विसर्जन

साडवली- देवरुख-संगमेश्वरला गणेशमूर्तींचे विसर्जन

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१p२९.jpg -२L४७१०२-देवरूख ः सप्तलिंगी नदी घाटावर गणपतींचे विसर्जन करण्याआधी आरती करताना भाविक.

देवरूख-संगमेश्वरला गणेशमूर्तींचे विसर्जन
साडवली, ता. १ : संगमेश्वर व देवरुखमधील दीड दिवसांच्या गणेशोत्सवातील गणेशमूर्तींचे गुरुवारी (ता. १) विसर्जन करण्यात आले. दीड दिवस भाविकांनी श्री गणेशाची मनोभावे पूजा अर्चा केली. देवरूख येथे वरची आळी, शाळा नं. १ ,खालची आळी सप्तलिंगी नदीघाटावर गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात बाप्पांना निरोप देण्यात आला. नदीघाटावर आरत्यांचे मंजूळ स्वर उमटले. देवरूख नगरपंचायत व राजू काकडे हेल्प अॅकॅडमी व श्री सत्यनारायण प्रासादिक बालमित्र समाज खालची आळी यांचे पथक तैनात होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत विसर्जन सोहळा सुरू होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92515 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..