रत्नागिरी-पर्ससीनला पन्नास हजार ते एक लाखाची उष्टी बांगडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-पर्ससीनला पन्नास हजार ते एक लाखाची उष्टी बांगडी
रत्नागिरी-पर्ससीनला पन्नास हजार ते एक लाखाची उष्टी बांगडी

रत्नागिरी-पर्ससीनला पन्नास हजार ते एक लाखाची उष्टी बांगडी

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat१p२८.jpg- KOP२२L४७१०१रत्नागिरी ः मासेमारीहून परतणारी नौका
-------------------
पर्ससीनला पन्नास हजार ते एक लाखाची उष्टी बांगडी
गुरुवारपासून सुरवात ; २५ टक्केच मच्छीमार समुद्रात रवाना
रत्नागिरी, ता. १ ः पर्ससीन नेटद्वारे मासेमारीला गुरुवारीपासून (ता. १) सुरवात झाली. मच्छीमारांना गणराय पावला असून वातावरण निवळले असल्याने समुद्रात जाण्याचा मार्ग सुरळीत होता. मच्छीमारांना सुरवातीलाच १०० ते २०० डिश (एक डिश ३२ किलोची) उष्टी बांगडी सापडली आहे. एका डिशला पाचशे रुपये प्रमाणे मच्छीमारांना पन्नास हजार ते एक लाख रुपयेपर्यंतची मासळी मिळाली.
शासनाच्या नियमानुसार १ सप्टेंबरपासून पर्ससीननेट मासेमारीला सुरवात होते. जिल्ह्यात पावणेतीनशेहून अधिक पर्ससिननेटने मासेमारी करणाऱ्या नौका आहेत. त्यात राजापूर, रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक नौका आहेत. ऑगस्ट महिन्यात ट्रॉलिंग, गिलनेटने मासेमारी सुरु झाली होती. पावसाळी वातावरणामुळे अनेकवेळा ब्रेक घ्यावा लागला.
गुरुवारी पहाटेला अनेक नौकांनी बारा वावाच्या पुढे जाऊन मासे पकडण्यासाठी जाळी मारली. पहिल्या फटक्या उष्टी बांगडी हा मासा बऱ्यापैकी जाळ्यात सापडला आहे. त्यातील काहींना शंभर डिश तर काहींना दोनशे डिश मासा मिळाला आहे. उष्टी बांगडी फिशमिलला पाठवण्यात येते. सध्याचा दर एका डिशला ५०० रुपये मिळत आहे.
जिल्ह्यातील एकूण पर्ससिननेट नौकांपैकी पन्नासहून अधिक नौका मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत.

चौकट
डिझेल, बर्फ दरवाढीचा फटका
डिझेल आणि बर्फाच्या वाढलेल्या दराचा फटका मच्छीमारांना बसणार आहे. समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या नौकांमध्ये केवळ ३ ते ४ दिवसांचेच इंधन भरले जात आहे. पुर्वी आठ दिवसांचे इंधन भरुन मासेमारीला नौका रवाना होतात. इंधन कमी असल्यामुळे जास्त खोल पाण्यात न जाता इंधनाचा विचार करुनच नौका समुद्रात जातील.

दोन दिवस मुसळधार पाऊस
हवामान विभागाच्या संदेशानुसार ३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी ३०-४० प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजेच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92528 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..