दीड दिवसांच्या गणरायांना निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीड दिवसांच्या गणरायांना निरोप
दीड दिवसांच्या गणरायांना निरोप

दीड दिवसांच्या गणरायांना निरोप

sakal_logo
By

swt132.jpg
47115
कुणकेश्वर ः दीड दिवसांच्या गणपतींना विसर्जनस्थळी नेताना भक्तगण.

देवगडात गणरायांना निरोप
गौरी गणपतींचे सोमवारी विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ : तालुक्यात विविध ठिकाणी आज दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. पारंपरिक आरत्या म्हणून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. ''पुढच्या वर्षी लवकर'' या असे आवाहन करीत गणरायाचे विसर्जन झाले.
बुधवारपासून (ता. ३१) गणेशोत्सवाला सुरुवात झाली. घराघरांत थाटात गणराय विराजमान झाले होते. आपल्या दैवताच्या स्वागतामध्ये काही कमी राहू नये यासाठी गणेशभक्त धावपळीत होते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे घराघरात काल गणेशाचे आगमन झाले होते. त्यातील काही गणपतींचे आज दीड दिवसांनी विसर्जन झाले. पाऊस नसल्याने सोयीचे झाले होते. पारंपरिक विसर्जन स्थळावर आरती म्हणून गणेश विसर्जन करण्यात आले. पावसाचा अंदाज घेत विसर्जन सुरु होते. दरम्यान, यंदा गौरी गणपतींचा मुक्काम सहा दिवसच आहे. त्यामुळे गौरी गणपतींचे सोमवारी (ता. ५) विसर्जन करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92530 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..