पान ३ क्राईम पट्टा मस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३ क्राईम पट्टा मस्ट
पान ३ क्राईम पट्टा मस्ट

पान ३ क्राईम पट्टा मस्ट

sakal_logo
By

शिवीगाळ प्रकरणी गुन्हा
ओरोसः येथील महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीसात तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी अगस्तीन लोबो (रा. ओरोस ख्रिश्चनवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
---------------
वाघाने केलेल्या हल्ल्यात
भेकुर्लीत वासराचा मृत्यू
साटेली भेडशी, ता. १ ः भेकुर्ली येथे पाळीव प्राण्यावर वाघाने हल्ला केला. त्यात म्हशीच्या वासराचा मृत्यू झाला. नवलू रामा पाटील यांच्या मुलासमोरच वाघाने हल्ला केल्याचे सांगण्यात आले. गेले काही दिवस तेथील धनगर वस्तीवर वाघाकडून पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. काही महिन्यांपूर्वी असाच हल्ला घरात घुसलेल्या प्राण्यांकडून झाला होता. त्यावेळी त्याच्या केसांचे पुंजके तपासणीसाठी पाठवले होते. शिवाय तो वाघ असल्याचा दावा खोडून काढत तो तरस असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर अनेक हल्ले झाले. त्यामुळे भयभीत ग्रामस्थांनी मंत्री दीपक केसरकर आणि वनाधिकाऱ्यांना भेटून पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यातच आता पुन्हा एकदा वाघाने शेतकऱ्याच्या समक्षच वासरावर हल्ला करुन त्याला ठार केले. त्यामुळे तेथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शासन त्यांच्या मरणाची वाट पाहत आहे काय? असा सवाल करून पुनर्वसनाच्या मागणीसाठी गणेशोत्सवानंतर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दिला आहे.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92535 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..