एटीएम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एटीएम
एटीएम

एटीएम

sakal_logo
By

एटीएम फोडून १४ लाख ५० हजारांची रक्कम लंपास
चिपळूण, ता. १ ः भोगाळे येथील युनियन बॅंकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी १४ लाख ५० हजारांची रोख रक्कम लुटली. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या भोगाळे परिसरात ऐन गणेशोत्सवात हा प्रकार घडला आहे. युनियन बॅंकेकडून याबाबतची तक्रार चिपळूण पोलिस ठाण्यात दिल्यावर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी घटनेची पाहणी करून तपास सुरू केला. शहरातील रहदारीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भोगाळे येथे युनियन बॅंकेच्या शाखेच्या परिसरातच बॅंकेचे एटीएम सेंटर आहे. काल (ता. ३१) गणेशोत्सवानिमित्त बॅंकेला सुटी होती. गणेशाचे आगमन झाल्यावर शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. सायंकाळनंतर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बाहेरची वर्दळ ठप्प झाली होती. शहरातील नागरिक घरातच सहकुटुंब गणेशोत्सव साजरा करण्यात मग्न होते. युनियन बँकेचा सुरक्षारक्षकही नव्हता. एरवीही एटीएम असलेल्या परिसरात रात्री नागरिकांची वर्दळ कमी असते. ही संधी साधून चोरट्यांनी पहाटे चारला एटीएम फोडले. यासाठी चोरट्यांनी लोखंडी हत्याराचा वापर केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. आज सकाळी हा प्रकार उघड झाल्यावर बॅंकेकडून याबाबतची माहिती चिपळूण पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
गेली काही वर्षे एटीएम फोडून चोरी करण्याचे प्रकार थांबले होते. मुंबई-गोवा महामार्गालगतचे एटीएम फोडणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. त्या टोळीतील एक आरोपी सावर्डे परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले होते. दीर्घ कालावधीनंतर गणेशोत्सवात हा प्रकार घडल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे आहे. तपासाच्या दृष्टीने सहकार्य व्हावे म्हणून रत्नागिरीतून श्वानपथक बोलावण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92555 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..