अरविंद सावंत यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरविंद सावंत यांचा सत्कार
अरविंद सावंत यांचा सत्कार

अरविंद सावंत यांचा सत्कार

sakal_logo
By

47151
कनेडी ः शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार अरविंद सावंत यांचा सत्कार करताना मान्यवर.

अरविंद सावंत यांचा सत्कार
कुंभवडे ता.२ ः गावचे सुपुत्र माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांचा संस्थेच्यावतीने तसेच शंकर महादेव विद्यालय कुंभवडे शालेय समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल सावंत यांचा हा सत्कार झाला.
शंकर महादेव विद्यालय व गुरुकुल या (कै.) मामा सावंत यांच्या संकल्पनेची परंपरा आपण अविरत पूढे चालू ठेवू तसेच कुंभवडे गावात सीबीएससी माध्यमाची शाळा लवकरच सुरू करून मामा सावंत यांचे शैक्षणिक विकास स्वप्न पूर्ण करू, असे प्रतिपादन श्री. सावंत यांनी केले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र रावराणे यांच्या हस्ते श्री. सावंत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव शशिकांत सावंत, गुरुकुल कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कृपाळ, कुंभवडे सरपंच आप्पा तावडे, मुख्याध्यापिका सौ. राणे, डॉ. शमिता बिरमोळे, अभ्युदय बॅंकेचे अधिकारी श्री. सदडेकर, गुरू पेडणेकर, प्रफुलता सुतार, मोहनराव सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92605 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..