पिंगुळी-शेटकरवाडीतील मंडळी आरती, भजनात दंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगुळी-शेटकरवाडीतील मंडळी आरती, भजनात दंग
पिंगुळी-शेटकरवाडीतील मंडळी आरती, भजनात दंग

पिंगुळी-शेटकरवाडीतील मंडळी आरती, भजनात दंग

sakal_logo
By

swt२२.jpg
४७२२४
पिंगुळीः शेटकरवाडी येथे गेले कित्येक वर्षे घरोघरी जाऊन भजन आरतीची करत परंपरा जोपासतात.

पिंगुळी-शेटकरवाडीतील
मंडळी आरती, भजनात दंग
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ः तालुक्यातील पिंगुळी-शेटकरवाडी येथे गेले कित्येक वर्षे घरोघरी जाऊन भजन आरतीची जोपासना केली जाते. हे गणेश भक्त श्रींच्या आरती, भजन करण्यात दंग झालेले दिसून येत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत जी गावे आज आपल्या विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत. यामध्ये पिंगुळी गाव. पिंगुळी गाव सांस्कृतिक चळवळीचे माहेरघर म्हणून संबोधले जाते. ठाकर समाजाची लोक कला याच गावातीलच आहे. गावातील ही लोककला संपूर्ण जगासमोर गेली आहे. अनेक कला विकसित होत असतानाच भजन, आरती या कला अनेक वर्षे येथील गणेशभक्त जोपासून ठेवत आहेत. पिंगुळी-शेटकरवाडी ही पिंगुळी गावातील मोठी वाडी म्हणून ओळखली जाते. या वाडीमध्ये सुमारे ७५ ते ८० गणपती घरोघरी आहेत. प्रत्येक घरामध्ये श्री गणेशाचे वास्तव हे दीड, पाच ते अकरा दिवसापर्यंत असते. विशेष म्हणजे अकरा दिवसाचे गणपती मोठ्या प्रमाणात या वाडीमध्ये असतात. या वाडीचे विशेष म्हणजे गेले कित्येक वर्ष प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आरती सादर करणे ही अनोखी प्रथा आजही टिकून ठेवली आहे. रात्री साडेआठच्या दरम्यान आरतीला सुरुवात होऊन मध्यरात्री एक ते दीड वाजेपर्यंत त्या संपविल्या जातात. हे भजनी, आरती प्रेमी श्रीगणेशाच्या भक्तीरसात तल्लीन झालेले दिसून येत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92636 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..