‘यहाँ आकर प्रसन्नता हुई’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘यहाँ आकर प्रसन्नता हुई’
‘यहाँ आकर प्रसन्नता हुई’

‘यहाँ आकर प्रसन्नता हुई’

sakal_logo
By

47226
कुडाळ ः पडतेवाडी शाळेची माहिती जाणून घेताना केंद्रीय पथकाचे संचालक जयप्रकाश पांडे. शेजारी इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)


‘यहाँ आकर प्रसन्नता हुई’

जयप्रकाश पांडे ः पडतेवाडी शाळा पहाणीदरम्यान गौरवोद्गार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः ‘यहाँ आकर अतिप्रसन्नता हुई, शिक्षक अच्छा काम कर रहे है’, असे गौरवोद्गार जलस्वराज्य अभियानांतर्गत नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन संचालनायाचे संचालक जयप्रकाश पांडे यांनी येथील पडतेवाडी शाळा पहाणी दरम्यान केले.
राज्य व केंद्राकडून जलस्वराज्य अभियान योजनेतून अनेक वर्षे जिल्ह्यातील विविध प्राथमिक शाळांना पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह विविध उपक्रम राबविण्यात आले. या योजनेचा आढावा केंद्रकडून घेण्यात येत असून जिल्ह्याच्या दौऱ्यावर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचे केंद्रीय संचालक पांडे यांनी जिल्ह्यातील काही प्राथमिक शाळांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तालुक्यातील काही शाळांना भेटी दिल्या. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, कुडाळ गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, केंद्रप्रमुख उदय शिरोडकर आदी उपस्थित होते. मुलांनी केलेले स्वागत, जल है तो कल है या आशयाच्या साकारलेल्या रांगोळ्या, मुक्त वाचनालय, शाळेचा स्वच्छ परिसर, चित्र प्रदर्शन, विविध स्पर्धा आदी सर्व पाहताना श्री. पांडे यांनी ‘यहाँ आकर अति प्रसन्नता हुई, प्रायमरी टिचर अच्छा काम कर रहे है’, असे गौरवोद्गार काढले. यावेळी मुख्याध्यापक सुरेखा कदम यांनी पांडे यांनी काढलेल्या गौरवोद्गारमुळे शिक्षकांना अधिक काम करण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली, अशा भावना व्यक्त केल्या तर प्राथमिक शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना स्वतः बक्षीस रक्कम देत नवा आदर्श निर्माण केला.
--
सहा शाळांना भेटी
जलस्वराज्य अभियान अंतर्गत केंद्रीय पथकाने कुडाळ तालुक्यातील सहा शाळांना भेटी देत शाळांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक दर्जा निश्चितच उत्तम असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे व सचोटीने काम करत असताना प्रशासनाकडून केलेल्या अभिनंदनामुळे शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92639 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..