पडोशी शाळेस शैक्षणिक साहित्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडोशी शाळेस शैक्षणिक साहित्य
पडोशी शाळेस शैक्षणिक साहित्य

पडोशी शाळेस शैक्षणिक साहित्य

sakal_logo
By

हुमरमळामध्ये गव्यांकडून नुकसान
कुडाळः हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या भात, नाचणीसह अन्य पिकांची गव्या रेड्यांच्या कळपाने नासधूस केली आहे. वनविभागाने पंचनामे करुन त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी हुमरमळा वालावल सरपंच अर्चना बंगे यांनी केली आहे. बंगे यांनी सांगितले की, ‘हुमरमळा करमळीवाडी, गाळवणेवाडी, पारकरवाडी, बिजोळेवाडी या डोंगर भागातून गव्यांचा भला मोठा कळप शेतात येतो आणि नासधूस करुन जातो. परंतु, वनविभागाला दुरध्वनीद्वारे कल्पना देऊनही दुर्लक्ष केला जातो. इथला शेतकरी हवालदिल झाला असून वनविभागाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी,’ अशी मागणी बंगे यांनी केली आहे.
---------
swt26.jpg
47228
चेंदवणः पडोशी शाळेत देवेंद्र नाईक यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.

पडोशी शाळेस शैक्षणिक साहित्य
कुडाळः चेंदवण गावचे माजी सरपंच, चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचे मालक देवेंद्र नाईक यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा चेंदवण पडोशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस पाटील उमेश शृंगारे, तालुका दक्षता समिती सदस्य भूपेश चेंदवणकर, मुख्याध्यापक सचिन मदने, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष केशव गवंडे, पालक सुनिल शृंगारे, सोनु टुंबरे, सुमन पोयरेकर, विनया पेडणेकर, माधुरी गवंडे आदी उपस्थित होते. नाईक यांचा शाळेच्यावतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह पोलिस पाटील शृंगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चेंदवण पडोशी शाळेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने अमृत महोत्सवी कार्यक्रमात विविध शैक्षणिक, भौतिक सुविधांबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री सचिन मदने यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92640 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..