सिंधुदुर्गातील 8 शिक्षकांना उत्कृष्ट पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गातील 8 शिक्षकांना उत्कृष्ट पुरस्कार
सिंधुदुर्गातील 8 शिक्षकांना उत्कृष्ट पुरस्कार

सिंधुदुर्गातील 8 शिक्षकांना उत्कृष्ट पुरस्कार

sakal_logo
By

swt२८.jpg
४७२३०
अदिती राणे, केशव जाधव, गुरुनाथ ताम्हणकर, सत्यवान चव्हाण, राजश्री शेट्ये,
डॉ. उत्तम तानवडे, विनोद मेतर


सिंधुदुर्गातील ८ शिक्षकांना उत्कृष्ट पुरस्कार
कोकण आयुक्त ः १६ जणांचे सादर केले होते प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः जिल्ह्यातील आठ शिक्षकांना २०२२ मध्ये चांगली कामगिरी केल्याबाबत ''उत्कृष्ट शिक्षक'' पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांसाठी जिल्ह्यातून एकूण १६ शिक्षकांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यातील जिल्हास्तरीय निवड समितीने आठ प्रस्तावांची निवड केली आहे. त्याला कोकण आयुक्तांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.
जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांत कणकवली तालुक्यातून जिल्हा परिषद लोरे नंबर १ शाळेचे उपशिक्षक सत्यवान चव्हाण, मालवण तालुक्यातून दाजीसाहेब प्रभुगावकर, जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ चे उपशिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, सावंतवाडी तालुक्यातून सावंतवाडी नंबर ४ शाळेचे पदवीधर शिक्षक केशव जाधव, देवगड तालुक्यातून जिल्हा परिषद हिंदळे भंडारवाडा शाळेच्या पदवीधर शिक्षिका अदिती राणे, वैभववाडी तालुक्यातून जिल्हा परिषद नाधवडे ब्राम्हणदेव नवलादेवीवाडी शाळेचे पदवीधर शिक्षिका राजश्री शेट्ये, वेंगुर्ले तालुक्यातून कोचरे नंबर २ शाळेचे उपशिक्षक विनोद मेतर, कुडाळ तालुक्यातून निवजे नंबर १ शाळेचे पदवीधर शिक्षक विजय धामापूरकर, दोडामार्ग तालुक्यातील घोटगे वायंगणतड शाळेचे उपशिक्षक डॉ. उत्तम तानवडे यांचा समावेश आहे. दरम्यान, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी ५ सप्टेंबरपूर्वी जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. त्यानुसार यावर्षी पुरस्कार जाहीर केले आहेत. मात्र, त्याचे वितरण कधी करणार हे जाहीर केलेले नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92642 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..