राजापूर-ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
राजापूर-ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

राजापूर-ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

sakal_logo
By

47247
.......................

ई केवायसी निर्धारित वेळेत पूर्ण करा
शेतकऱ्यांना तहसीलदार शीतल जाधव यांचे आवाहन; ७ सप्टेंबरपर्यंत विशेष शिबिर
राजापूर, ता. २ ः बोगस शेतकरी शोधण्यासह बारावा हप्ता देण्यासाठी शासनाने केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेसाठी शासनाकडून संबंधित लाभार्थ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ही ई केवायसी बुधवारपर्यंत (ता. ७) करण्याची अंतिम मुदत देण्यात आली असून निर्धारित कालावधीमध्ये ई केवायसी करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी निर्धारित कालावधीमध्ये ई केवायसी करावी, असे आवाहन तहसीलदार शीतल जाधव यांनी केले आहे.
पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांना ई केवायसी करणे सुलभ व्हावे म्हणून तहसील कार्यालयातील सेतू कार्यालय आणि महा ई सेवा केंद्र येथे येत्या बुधवारपर्यंत (ता. ७) विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये सकाळी १० ते ६ या कालावधीमध्ये ई केवायसी करता येणार आहे. याचा लाभार्थी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार जाधव यांनी केले आहे. केंद्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये शेतकऱ्यांना काही रक्कम वर्षाला दिली जाते. मात्र काहींनी बोगस कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ घेतल्याची बाब मध्यंतरी पुढे आली होती. अशा प्रकारांना आळा बसावा आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लोकांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने शासनाने अशा लाभाथ्यांना ई केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केलली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयातील सेतू कार्यालय आणि महा ई सेवा केंद्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या या शिबिरामध्ये ई केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड व आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत घेऊन येण्याची सूचना महसूल प्रशासनाने केली आहे.

कोट
शासनाने आता पीएम किसान योजनेतील बारावा लाभाचा हफ्ता देण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अधिक सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून येथील तहसील कार्यालयातर्फे विशेष शिबिराचेही आयोजन केले आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभार्थी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
- शीतल जाधव, तहसीलदार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92652 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..