रामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामेश्वर मंदिरात
विविध कार्यक्रम
रामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम

रामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम

sakal_logo
By

रामेश्वर मंदिरात
विविध कार्यक्रम
आचरा ः इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, कसबा आचरातर्फे येथील रामेश्वर मंदिरात गणेश मूर्तीची स्थापना दिमाखात करण्यात आली. २१ दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात १० ते २० सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १० सप्टेंबरला रात्री साडेनऊला आचरा पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा, ११ ला रात्री साडेनऊला समूहगीत स्पर्धा. १२ ला रात्री साडेनऊला ओंकार दशावतार नाट्यमंडळ, राठिवडे यांचा ‘सिंदुरसंग्राम’ नाट्यप्रयोग, १३ ला रात्री साडेनऊला भजन स्पर्धा, १४ रोजी रात्री साडेनऊला शिवरामेश्वर ट्रॅव्हल्सचे बाणे यांच्या सौजन्याने ‘अधांतर’ हा कलेश्वरमंडळाचा नाट्यप्रयोग, १५ ला रात्री साडेनऊला फुगडी स्पर्धा, १६ ला जोडी नृत्य स्पर्धा, १७ ला रात्री साडेनऊला देवी भगवती दशावतार मंडळाचा ‘गणेशलीला’ नाट्यप्रयोग होल. तर १९ ला सत्यनारायण महापूजा व रात्री दहाला संदीप लोके व अरुण घाडी यांच्यात डबलबारी भजनाचा सामना होणार आहे.
----------------------
बालग्रंथासाठी
पुरस्कार जाहीर
कणकवली ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २०२१ या वर्षातील विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये कणकवलीतील शिक्षिका कल्पना मलये यांच्या ‘कारटो’ या बालग्रंथाचा समावेश आहे. पुणे येथील एस. एम. कल्पना मलये जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात १२ सप्टेंबरला सकाळी साडेदहाला ज्येष्ठ हिंदी लेखिका सूर्यबाला यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कल्पना मलये यांच्या ‘कारटो’ या बालग्रंथाला वि. वि. बोकील स्मृती पारितोषिक जाहीर झाले आहे. मलये या कणकवली जिल्हा परिषद शाळा नंबर ५ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ‘कारटो’ या बालवाङमय ग्रंथाच्या पहिल्या दोन आवृत्ती हातोहात संपल्यानंतर तिसरी आवृत्तीही प्रसिद्ध झाली. आजरा येथील ऋग्वेद प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केले असून याची प्रस्तावना डॉ. विजया वाड यांनी लिहिली आहे.
--
केसरकरांच्या
घरी सीसीटीव्ही
सावंतवाडी ः राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे सावंतवाडी येथील संपर्क कार्यालय व निवासस्थान श्रीधर अपार्टमेंट सध्या सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहे. केसरकर यांचे सावंतवाडी येथील श्रीधर अपार्टमेंट निवासस्थान सावंतवाडी बसस्थानकाजवळ आहे. केसरकर हे तीन टर्म सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत; परंतु गेल्या बारा वर्षांत त्यांना कधी पोलिस बंदोबस्त अथवा त्यांच्या संपर्क कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा नव्हती; मात्र सध्या केसरकर यांचे श्रीधर अपार्टमेंट निवासस्थानाच्या अवतीभोवती सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच पोलिसांचा फौजफाठा बंदोबस्तासाठी तैनात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92674 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..