संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

हातिवचे गणपत कदम यांचा गौरव
रत्नागिरी ः हातिव (ता. संगमेश्वर) येथील गणपत कदम यांचा ह्युमन इंटरनॅशनल राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व नरो या ट्रस्टमार्फत गौरव करण्यात आला. त्यांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगीरीबद्दल नुकताच त्यांचा ८५वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्याबद्दल असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष बाळकृष्ण वनकर, तालुकाध्यक्ष तेजा भोपाळकर, रफीक दोस्ती, अॅड. पवार यांनी विशेष कौतुक केले आहे.

बोरिवली शाळेचे दोन विद्यार्थी चमकले
गावतळे ः दापोली तालुक्यात गत पाचवर्षापासून दापोली शिक्षण विभागाने अंगीकारलेल्या व्हिजन दापोली उपक्रमाचा परिणाम पुन्हा दिसून येत असून, जाहीर झालेल्या आठवीच्या एनएमएमएस परीक्षेतही तालुक्यातील १३ विद्यार्थ्यांची निवड झाली. तालुक्यात दोनच जि. प. शाळेत ८वीचे वर्ग सुरू असून पैकी बोरिवली शाळेतील प्रियेश शिंदे व प्राची रेवाळे या दोन्ही विद्यार्थ्यांना यापरीक्षेत सुयश मिळाले. हे यश व्हिजन दापोलीचा इफेक्ट असल्याचे गटशिक्षणाधाकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले.


सोनवडे येथे राष्ट्रीय क्रीडादिन साजरा
साडवली ः सोनवी, घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ सोनवडे संचलित माध्यमिक विद्यालय सोनवडे प्रशालेत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती अर्थात राष्ट्रीय क्रीडादिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सन १९२८, सन १९३२ आणि सन १९३६ मध्ये भारतीय संघाने मेजर ध्यानचंद यांच्या एकहाती वर्चस्वातून प्राप्त केलेल्या ऑलिंपिक सुवर्णपदकांची आठवण सांगितली. सन १९२८ ते १९६४ दरम्यानच्या ८ ऑलिंपिकमधील भारताची यशस्वी कारकीर्द विशद केली. राष्ट्रीय क्रीडादिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री स्पर्धा, राज्यस्तरीय संगमेश्वर मॅरेथॉन आणि क्रांतीदिन आकार ऑर्गनायझेशन, देवरूख मॅरेथॉन या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थी विराज बडद (७वी), अक्षता रेवाळे आणि कोमल रेवाळे (दोघी १०वी) यांना सन्मानित करण्यात आले.प्रशालेने आयोजित केलेल्या मेजर ध्यानचंद दौडमध्ये ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मेजर ध्यानचंद यांची हॉकी खेळातील महती व योगदान गावातील आबालवृद्ध नागरिकांना व्हावी यासाठी मेजर ध्यानचंद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या रॅलीमध्ये प्रशालेतील ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यानंतर खो-खो व कबड्डीचे रंगतदार सामने झाले.
---------


जय मल्हार ग्रुपच्या आरती संग्रहाचे प्रकाशन

गावतळे ः सालाबादप्रमाणे जय मल्हार ग्रुप मुंबई यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यापैकी एक आरती संग्रह पुस्तक प्रकाशन सोहळा मुंबई येथे सोमवारी (ता. १५) अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्रुपचे मार्गदशक जनार्दन हळदे यांच्या अध्यक्षतेखाली महेंद तुरखिया, अजय जाधव, दीपेंद्र पारदुलें, पत्रकार मिलिंद खारपाटील, सुरेश भिवा पाटील, पत्रकार प्रवीण शिंदे,
देवजी मोंडे, स्वप्नील चाळके यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ग्रुपचे अध्यक्ष दत्ता गावडे, कार्याध्यक्ष योगेश ठोंबरे, सहग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.
--------------

डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयात संस्कृतदिन


चिपळूण ः संस्कृतदिनाचे निमित्त साधून येथील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाङ्मयमंडळाचे उद्घाटन झाले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळातर्फे संस्कृत विभाग, भाषा अध्ययन केंद्र आणि संस्कृत भारती संस्थेच्या सहयोगाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी वक्ता म्हणून संस्कृतभारतीचे रत्नागिरी जिल्हा शिक्षणप्रमुख, अॅड. आशिष आठवले उपस्थित होते.
संस्कृत शिक्षण आणि भगवद्गीता प्रशिक्षण या परीक्षांचे प्रमाणपत्र वितरण या वेळी करण्यात आले. संस्कृत विभागाच्या बारावीच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या आविष्कार या भित्तिपत्रकाच्या संस्कृत विशेषांकाचे उद्घाटन करण्यात आले.
सुभाषित पठण मीरा शहाणे तर स्तोत्रगायन स्वरांगी म्हैसकर हिने सादर केले. भगवद्गीता प्रशिक्षण घेणाऱ्या मिताली केतकर यांनी व्हॉटस्अॅपवरील संदेशाचा संस्कृत अनुवाद सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन आयुष आगवेकरने केले. अतिथी परिचय तन्वी जोगळेकर तर सूत्रसंचालन चिन्मयी टीकेकर हिने केले.
.........

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92676 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..