शिरगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांस मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांस मदत
शिरगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांस मदत

शिरगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांस मदत

sakal_logo
By

swt२१८.jpg
४७२६४
शिरगावः येथील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी पाच हजाराची देणगी रवींद्र जोगल यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

शिरगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांस मदत
देवगड, ता. २ ः तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रफुल्ल आईर यांनी पाच हजार रुपये देणगी दिली. प्रफुल्ल विठ्ठल आईर यांनी (कै.) विठ्ठल चंद्रकांत आईर, (कै.) मंदाकिनी विठ्ठल आईर, व (कै.) पूजा प्रफुल्ल आईर यांच्या स्मरणार्थ उच्च माध्यमिक वर्गातील एका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक खर्चासाठी पाच हजार रुपयाचा धनादेश संस्थेचे मुख्य खजिनदार रघुनाथ चव्हाण यांचेकडे मानद अधीक्षक रवींद्र जोगल यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला. प्रफुल्ल आईर यांनी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक खर्चासाठी दिलेल्या देणगी बद्दल संस्थेतर्फे व शाळेतर्फे आभार मानण्यात आले.
.......................

सावंतवाडीत १२ रोजी आमसभा
सिंधुदुर्गनगरी, ता. २ ः सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा ९ सप्टेंबरला सकाळी १०.३० वाजता आमदार तथा मराठी भाषा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली वैश्य भवन हॉल, गवळी तिठा येथे आयोजित केली होती. मात्र, या सभेच्या दिनांकांत बदल करण्यात येत असून ही सभा १२ ला सकाळी १०.३० वाजता त्याच स्थळी होणार आहे, अशी माहिती आमसभा सचिव तथा सावंतवाडी गट विकास अधिकारी यांनी दिली आहे.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92692 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..