साडवली- माझा गणपती माझा मताधिकार ठरतोय लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली- माझा गणपती माझा मताधिकार ठरतोय लक्षवेधी
साडवली- माझा गणपती माझा मताधिकार ठरतोय लक्षवेधी

साडवली- माझा गणपती माझा मताधिकार ठरतोय लक्षवेधी

sakal_logo
By

आले गणराय लोगो घेणे...


फोटो ओळी
-rat२p४.jpg -४७२२०साडवली ः माझा गणपती माझा मताधिकार हा लक्षवेधी ठरलेला देखावा.
----------------------

माझा गणपती माझा मताधिकार ठरतोय लक्षवेधी

शिक्षक सुनील करंबेळे ; मतदान करणारच विषयावर रांगोळी

साडवली, ता. २ : दरवर्षी येणाऱ्या गणेशोत्सवातून जनतेचे प्रबोधन करावे हा उद्देश मनात ठेवून यावर्षी देवरूख येथील शिक्षक सुनील करंबेळे परिवाराने लोकशाहीच्या बळकटीसाठी माझा गणपती माझा मताधिकार हा देखावा न्यू इंग्लिश स्कूल देवरूख मोरील गुरुकुल नगरमध्ये निवासस्थानी उभा केला आहे .
या देखाव्यामध्ये त्यांनी मतदान करताना आपण कोणत्या उमेदवाराला मतदान करावे '' उमेदवार कसा नसावा '' मतदान का केले पाहिजे मतदान प्रक्रियेमध्ये आतापर्यंतचे बदल, मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड कसे लिंक करावे, आतापर्यंतची मतदानाची टक्केवारी चित्ररूपात व घोषवाक्यांद्वारे दाखवून अठरा वर्षे पूर्ण होताच नमुना ६ कसा भरावा, नावात बदल असल्यास नमुना ८ कसा भरावा, याची माहिती दिली आहे. तसेच मी लोकशाही बोलते आहे या ध्वनीच्या माध्यमातून आलेल्या गणेश भक्तांना स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्यासाठी काय केले पाहिजे हे ऐकविले जाते. या विषयाला धरून मी मतदान करणारच या विषयावर रांगोळी ही रेखाटली आहे. हा देखावा उभा करण्यास परिवारातील सदस्यांप्रमाणे महारुद्र फर्निचरचे मालक किरण जोयशी '' पदवीधर शिक्षक विनय होडे, दिशा कोटकर यांचे सहकार्य मिळाले आहे. यापूर्वीही गणेश भक्तांच्या प्रबोधनासाठी पर्यावरण रक्षण, प्लास्टिक मुक्ती, अमृत महोत्सवी भारताची वाटचाल आदी विषयांवरील देखावे उभे करण्याचे काम या परिवाराने करून स्पर्धेत ही यश मिळविले आहे.

----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92744 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..