खेड प्राथमिक शिक्षक संघातर्फे गुणगौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड प्राथमिक शिक्षक संघातर्फे गुणगौरव
खेड प्राथमिक शिक्षक संघातर्फे गुणगौरव

खेड प्राथमिक शिक्षक संघातर्फे गुणगौरव

sakal_logo
By

खेड प्राथमिक शिक्षक संघातर्फे गुणगौरव
खेड ः खेड प्राथमिक शिक्षक संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त शिक्षकांसह सवेणी शाळा क्र.१ मधील शिक्षकांनाही गौरविण्यात आले. बीडीएस, एमटीएस, नवोदय, योगा, तायक्वाँदो स्पर्धेसह दहावी, बारावी, इंजिनिअर आदी परीक्षांमधील गुणवंतासह १९ वेळा रक्तदान करणारे राहुल तुगावकर, गणेश सानप, देशभक्तीपर गीत रचना स्पर्धेतील प्रथम दादासाहेब शेख, नुतन विस्तार अधिकारी मोहिते, कवयित्री दीप्ती यादव, आदर्श शिक्षक संतोष जाधव, स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त लोटेमाळ शाळा यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष सत्यविजय मोरे, विलास गुजर, जिल्हा सचिव दीपक मोने, चिपळूण संघाचे अध्यक्ष आशू गांधी, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष उतेकर, जिल्हा नेते प्रमोद मोहिते आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92755 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..